आटपाडीत असाध्य आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे करत असल्याचा दावा करत त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न डॉ. संजय गेळे करत होता. त्याच्या विरोधात जोरदार विरोध झाला. याप्रकरणी डॉ. गेळे याला पोलिसांनी अटक केली.
सापळा रचून केली अटक
आटपाडी येथील वरद हॉस्पिटलमध्ये संजय गेळे आणि त्यांची पत्नी अश्विनी हे दोघे अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरवर असणाऱ्या महिलेच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून तंत्र-मंत्र म्हणत त्यांना बरे करत असल्याचा दावा केला. अशा प्रकारे समाजात त्यांनी अंधश्रद्धा पसरवली, तसेच यामाध्यमातून ख्रिस्ती धर्मांतर घडवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संपतराव नामदेव धनवडे यांनी डॉ. गेळे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. याविरोधात आटपाडीत हिंदुत्ववादी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यामुळे पोलिसांवर दबाव आला. आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे आणि प्रमोद रोडे, शंकर पाटील यांनी बुधवारी, 28 डिसेंबर रोजी रात्री सापळा रचून संजय गेळेला अटक केली. मात्र, अश्विनी फरार आहे. तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे.
Join Our WhatsApp Community