भरदिवसा दागिन्यांच्या दुकान मालकावर गोळीबार!

दुकानदार हा जखमी होऊन खाली कोसळताच या तिघांनी दुकानातील दागिने आणि दोन वजनदार ट्रॅव्हल्स बॅगा घेऊन आलेल्या दुचाकीवरून पळून गेले.

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी भरदिवसा एका ज्वेलरी शॉपमध्ये घुसून गोळीबार करून लूट केल्याची खळबळजनक घटना बुधवारी, ३० जून रोजी सकाळी दहिसर येथे घडली. या गोळीबारात ज्वेलरी शॉपमध्ये असणाऱ्या एकाचा मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर लुटारुंनी पोबारा केला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रिव्हॉल्व्हरमधून दुकानदारावर गोळी झाडली!

दहिसर येथील रावळपाडा, गावडे नगर या ठिकाणी असलेल्या ओमसाईराज ज्वेलर्स दुकानात बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ऍक्टिव्हा या दुचाकीवरून तिघे जण आले, त्यावेळी दुकानात असलेल्या दुकानदाराला काही कळण्यापूर्वीच एकाने स्वतः जवळील रिव्हॉल्व्हरमधून दुकानदारावर एक गोळी झाडली. दुकानदार हा जखमी होऊन खाली कोसळताच या तिघांनी दुकानातील दागिने आणि दोन वजनदार ट्रॅव्हल्स बॅगा घेऊन आलेल्या दुचाकीवरून पळून गेले. हा प्रकार केवळ काही मिनिटांमध्ये घडल्यामुळे काय झाले हे अनेकांच्या लक्षात आले नाही. मात्र बॅगा घेऊन पळून जाताना काही लोकांनी बघताच त्यांनी ज्वेलर्सच्या दुकानात धाव घेतली असता दुकानदार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

(हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होती कि अराजक! ४ दिवसांत १५ हजार दंगली!)

सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दुकानदाराला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी हत्या आणि लुटीचा गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून लुटारूचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लुटारू हे १८ ते २५ वयोगटातील असून त्यांनी चेहऱ्यावर मास्क घालून ग्रे रंगाच्या ऍक्टिव्हा दुचाकीवरून पोबारा केला आहे. या लुटीत लाखो रुपये किमतीच्या सोन्याची लूट झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here