जागतिक पातळीवर ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवरील एकूण तापमानात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्या या आठवड्यात पश्चिम युरोपमधील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दक्षिण युरोप आधीच कडाक्याच्या उन्हाच्या झळा सहन करत आहे. या बदलल्या वातावरणाचे तेथील हवामान शास्त्रज्ञ अक्षरशः ‘नरक’ असे वर्णन करत आहेत.
वातावरणात वाढलेल्या पाऱ्यामुळे फ्रान्स आणि पोर्तुगालातील काही भागांतील जंगलांना आगी लागल्या आहेत. यामुळे यूकेमध्ये तापमान पहिल्यांदाच 104 अंशा (Celsius to Fahrenheit)वर जाऊ शकते, तसेच युरोपचा बराचसा भाग हा प्रचंड उष्णतेने व्यापला जाणार आहे. ब्रिटनच्या राष्ट्रीय हवामान संस्थेने तर उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दक्षिण इंग्लंडचा बराचसा भूभाग 40 अंश सेल्सिअस किंवा सुमारे 104 अंशा (Celsius to Fahrenheit)पर्यंत पोहोचू शकते, असेही हवामान शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. तर यूकेमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानात सहसा कुणी जिवंत राहू शकत नाही, असे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ जोनाथन एर्डमन यांनी म्हटले आहे.