जळगावमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या पालखीवर मुसलमानांकडून दगडफेक 

113

जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे २८ मार्चच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ‘वीर जवान मित्र मंडळा’च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे सप्तश्रृंगी वणी गडावर पालखीची दिंडी जात असतांना १०० ते १५० जणांचा जमावाने पालखीवर दगडफेक केली. या दगडफेकीत एका पोलिसासह ३ भाविक घायाळ झाले असून दंगलखोर मुसलमानांनी ३ वाहनांचीही तोडफोड केली. पाळधी गावात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त असून गावात तणावपूर्व वातावरण होते. २९ मार्च या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद होती. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पाळधी गावात प्रतिवर्षीप्रमाणे सप्तश्रृंगी देवीच्या पालखीची मुख्य मार्गावरून दिंडी काढली जाते. या मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर एक मशीद आहे. २८ मार्च या दिवशी ही दिंडी जात असतांना त्या मशिदीजवळ पालखी आली असता अचानक दंगलखोर मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक चालू केली. या दगडफेकीत पालखीतील सप्तश्रृंगी देवीच्या प्रतिमेची काच फुटली, तसेच ३ हिंदु भाविक जखमी झाले. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे दिंडीतील भक्तांमध्ये गोंधळ उडाला. सर्वत्र पळापळ झाली. ही दगडफेक ५ मिनिटे चालू होती. त्यानंतर पाळधी गावातील हिंदुत्ववादी, ग्रामस्थ आणि धर्मप्रेमी यांनी दंगलखोर मुसलमानांच्या हल्ल्याच्या विरोधात पोलीस ठाणे गाठले. या वेळी या सर्वांनी धर्मांधांना त्वरित अटक करावी, अशी मागणी केली. या दंगलीत  १० ते १५ चारचाकी आणि दुचाकी यांची तोडफोड करण्यात आली. दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला.

(हेही वाचा इंदूरमध्ये मोठी दुर्घटना; रामनवमीचा उत्सव सुरू असताना मंदिरातील विहिरीचे छत कोसळले, २५ भाविक अडकल्याची भीती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.