लोकल प्रवासी स्वतःहूनच झाले मास्क मुक्त आणि मग…

139

राज्यात कोरोना रुग्णसंख्या घटत आहे. या घटणा-या रुग्णसंख्या लक्षात घेता, सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. लोकलमध्येही पुन्हा गर्दी पहायला मिळत आहे. कार्यालयीन वेळेत लोकलने प्रवास करणा-यांची संख्या अधिक असते. अशातच सामान्य स्थितीमध्ये मास्कशिवाय पकडलेल्या लोकांच्या तुलनेत, मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागात अवघ्या एका महिन्यात विनामास्क फिरणा-या प्रवाशांची संख्या 10 पटीने वाढली आहे.

जानेवारीत 4 लाखांचा दंड वसूल

नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार, विनामास्क फिरणा-या 780 लोकांवर मे 2021मध्ये कारवाई करण्यात आली होती. डिसेंबर 2021मध्ये हा आकडा कमी झाला, या महिन्यात केवळ 197 विनामास्क फिरणा-या लोकांवर कारवाई केली गेली. पण आता लोक मात्र निष्काळजीपणाने वागत असल्याचे समोर येत आहे. या नव्या वर्षात जानेवारीमध्ये तब्बल 2 हजार 43 विनामास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत 4 लाख रुपयांचा दंड जमा करण्यात आला.

( हेही वाचा :खुशखबर! माझगाव डॉकमध्ये दीड हजार नोकऱ्यांची संधी…)

विनामास्क फिरणा-यांच्या संख्येत वाढ

मागच्या वर्षापेक्षा या नव्या वर्षात आम्ही दिवसाला जवळपास 100 अशा प्रवाशांवर कारवाई करत आहोत, ज्यांनी मास्क घातलेला नाही. जानेवारी महिन्यात विनामास्क लोकल प्रवास करणा-या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.