सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. पण येत्या वर्षात दुचाकी स्वारांना झारखंड राज्याने खूशशबर दिली आहे. पेट्रोल जवळपास २५ रुपयांनी स्वस्त होणार आहे. देशभरात पेट्रोलचे दर दिवसेंदिवस महाग होत असतानाच झारखंडमध्ये दुचाकीस्वारांना 25 रुपये स्वस्त दराने पेट्रोल मिळणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज, बुधवारी याबाबत घोषणा केली.
झारखंड सरकारचा मोठा निर्णय
झारखंड सरकारने दुचाकी चालकांना पेट्रोलवर 25 रुपये सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज याबाबत घोषणा केली आहे. आगामी 26 जानेवारी 2022 पासून यावर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे गोर-गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे झारखंड सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला फायदा मिळावा या हेतूने ही योजना आणली आहे. याचा जास्तीत जास्त लाभ हा गरीब जनतेला देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सोरेन यांनी सांगितले.
( हेही वाचा : पुण्यात पीएमटी बसचे रूपांतर महिला स्वच्छतागृहात! )
२६ जानेवारीपासून नवीन दर लागू होणार
रांचीमध्ये सध्या एक लिटर पेट्रोल ९८ रुपये ५२ पैसे दराने विकले जात आहे. डिझेलचा दर प्रतिलिटर 91 रुपये 56 पैसे आहे. हेमंत सोरेन सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी ही खुशखबर दिली आहे. ते म्हणाले की, पेट्रोलच्या वाढलेल्या दरामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक अधिक नाराज आहेत, त्यामुळे त्यांना हा दिलासा देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community