माथेरानमध्ये धावणार मिनी बस!

151

माथेरान पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण असल्याने या भागात पेट्रोल-डिझेलवरील वाहनांवर बंदी आहे. नेरळ-कर्जत येथून माथेरानला जाण्यासाठी स्वत:च्या मालकीच्या वाहनांनी, एसटी किंवा टॅक्सीने जावे लागते. परंतु माथेरानला एसटीने जाण्यासाठी केवळ दोनच फेऱ्या होत असल्यामुळे प्रवाशांना महागड्या खासगी टॅक्सीतून प्रवास करावा लागतो. यावर उपाय म्हणून माथेरान नगर परिषदेने परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : मोबाईल डेटा लवकर संपतोय? लगेच बदला या सेटिंग्ज )

एसटी महामंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती

माथेरानमध्ये मिनी बस सेवा सुरू करण्यासाठी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. नगराध्यक्ष प्रेरण सावंत यांच्यासह सर्व सदस्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. फक्त एसटी महामंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती आणि महामंडळानेही प्रमाणपत्र दिल्याने माथेरान परिवहनचे एक पाऊल पुढे पडले आहे. यासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा मागवण्यात येणार असून ही परिवहन सेवा दिवाळीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रवाशांना माथेरान परिवहनमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. अशी माहिती माथेरान नगरपरिषदेने दिली आहे.

पर्यटनास चालना मिळेल 

सध्या माथेरानमध्ये दिवसातून एसटीच्या केवळ दोन फेऱ्या सुरू असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांसह, स्थानिक नागरिकांचीही मोठी गैरसोय होते. तसेच विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे अनेक कुटुंबे माथेरान सोडून कर्जत तसेच नेरळ येथे स्थायिक होत आहेत. यामुळे माथेरानच्या लोकसंख्येवर सुद्धा परिणाम होत आहे. त्यामुळे ही परिवहन सेवा माथेरानमध्ये सुरू झाल्यास पर्यटनास चालना मिळून माथेरानचा विकास होण्यासही मदत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.