एकीकडे देशभरात इंधनदर वाढीने सामान्य नागरिक हैराण झाले असताना आता रोजच्या वापरातील दुधाच्या किंमतीने देखील उसळी घेतली आहे. महाराष्ट्रातील असा एक जिल्हा आहे, त्या ठिकाणी तब्बल 10 रुपयांनी दूध महागले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – बेस्टच्या आगारात अधिकार्यांची मनमानी; ऐकूनच घेई ना कोणी!)
महाराष्ट्रातील कोणता आहे तो जिल्हा?
मिळालेल्या माहितीनुसार, म्हशीचे दूध हे आता 70 रुपये लीटर इतक्या उच्चांकी दरांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे गायीचे दूधही पन्नास रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या महागाईत दुधाचीही दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात ही दुधाची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीने नंदुरबारमधील लोकांना आता दूध खरेदीदरम्यान, तब्बल 10 रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.
कोणी केली घोषणा
प्रमुख दूध विक्रेत्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सुट्या दुधाची किंमत 10 रुपयांनी वाढवण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे दुधाचे दर आता वाढून 50 आणि 70 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गायीच्या दुधाचे दर आधी 40 रुपये प्रतिलीटर होते ते वाढून 50 रुपयांवर पोहोचले आहेत. दर म्हशीच्या दुधाची किंमत ही 60 रुपयांवर 70 रुपये प्रतिलीटर इतकी झाली आहे. नंदुरबारमध्ये गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे दुधात भाववाढ करण्यात आली नव्हती. मात्र यंदा दुष्काळामुळे महागलेला चारा आणि गायी म्हशीच्या ढेप आणि खाद्यपदार्थांचे दर वाढल्यामुळे दुधाच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत, असे दूध विक्रेत्यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community