Marathi Name Plate : मुंबईत आजही ५,२१७ दुकानांच्या पाट्या अमराठी भाषेतूनच

154
Marathi Sign Board : अद्यापही सुमारे दोन हजार दुकानांच्या पाट्यांवर मराठी नाहीच
Marathi Sign Board : अद्यापही सुमारे दोन हजार दुकानांच्या पाट्यांवर मराठी नाहीच

मराठी पाट्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने दुकानदारांना झापल्यानंतर पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मराठी पाट्यांबाबत महापालिकेने राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये २८ हजार ६५३ दुकानांना भेटी देण्यात आल्या होत्या. त्यातील ५२१७ दुकानांना अद्यापही पाट्या मराठीत केल्या नसून आजवर केवळ २३ हजार ४३६ दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्या असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. मागील वर्षी १० ऑक्टोबर २०२२ पासून मुंबईतील मराठी भाषेतील दुकानांच्या पाट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्या आठ दिवसांमध्ये मराठीतून नामफलक नसलेल्या ३०३४ दुकानांना महापालिकेच्या दुकान व आस्थापना विभागाने नोटीस बजावली होती. त्यानंतर १० ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एकूण २३ हजार ४३६ दुकानांना नोटीस बजावून त्या दुकानांना मराठीतून पाट्या लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नोटीस बजावलेल्या काही दुकानांनी मराठीतून पाट्या लावण्याची कार्यवाही पूर्ण केली, परंतु त्यातील ५ हजार २१७ दुकानांकडून अद्यापही मराठी भाषेतून अद्यापही पाट्या लावलेल्या नसल्याची महापालिकेच्या नोंदींवरून स्पष्ट होते.

राज्य सरकारने मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीतून प्रदर्शित करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने राबवलेल्या मोहिमेला दुकानदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दुकानदारांच्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आपले मत नोंदवले. न्यायालयाने याबाबत दुकानदारांना प्रश्न विचारत, सरकारने स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला मान्य करायला काय हरकत आहे? अशाप्रकारे कोर्ट कचेरीवर पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा असा सल्लाही दिला. यासाठी व्यापाऱ्यांना पुढील महिन्यांची मुदतही न्यायालयाने दिली आहे. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या निरिक्षकांनी केलेल्या सर्वेमध्ये मुंबईतील एकूण २ लाख दुकानांच्या पाट्यांपैंकी केवळ ४८ टक्के म्हणजे ९७ हजार दुकानांच्या पाट्या या मराठी भाषेत असल्याचे आढळून आले होते. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यांत प्रत्यक्ष दुकानांची पाहणी करण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी संपूर्ण मुंबईतील २ हजार १५८ दुकानांना भेटी देण्यात आल्या. त्यातील १६३६ ठिकाणच्या दुकानांवर मराठी नामफलक आढळून आले, उर्वरीत ५२२ ठिकाणी मराठी नामफलक नसल्याचे आढळून आले होते. तर १८ ऑक्टोबर पर्यंत महापालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाने एकूण १३ हजार ९४२ दुकानांना भेटी दिल्या. त्यात १० हजार ९०८ दुकानांचे नामफलक मराठी असल्याचे आढळून आले. तर १० ते १८ ऑक्टोबरच्या कालावधीत अधिनियमानुसार एकूण ३०३४ दुकानांचे नामफलक हे मराठीत नसल्याचे आढळून आले.

(हेही वाचा – Rudraksh Patil : आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलच्या यशाची कहाणी…)

१० सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२२ च्या कालावधीतील दुकानांच्या एकूण भेटी : १३,९४२
मराठीतून पाट्या असलेल्या दुकानांची संख्या : २३, ४३६
नोटीस बजावलेल्या दुकानांची संख्या : ५, २१७
मराठीतून पाट्या न लावलेल्या दुकानांची संख्या : ५, २१७

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.