मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टने प्रवास करणा-यांसाठी मोठी बातमी!

मुंबईत (Mumbai) आता एकाच तिकीटावर सार्वजनिक ठिकाणी प्रवास करता येणार आहे. मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्ट (Metro, Mono, railway, best) प्रवास आता एकाच तिकीटात करता येणार आहे. एमएमआरडीएची (MMRDA) एकात्मिक प्रणाली सुविधा 19 जानेवारीपासून सेवेत येत आहे. भविष्यात हे कार्ड देशभरातल्या कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वापरता येईल. या सुविधेची सुरुवात गुरुवारी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुंबई आणि मुंबई महानगर (Mumbai Mahanagar) प्रदेशातील वाहतूक व्यवस्था बळकट करतानाच प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे.

( हेही वाचा: वाशी पुलावरील वाहतूक बंद; मुंबईला जाणा-या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी )

मुंबई आणि उपनगरीय रेल्वेमध्ये एकात्मिक तिकीट प्रणालीची अंमलबजावणी आता होणार असून रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट आदींमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एकाच तिकिटाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

‘अशी’ असणार सुविधा

या योजनेनुसार, रेल्वे स्थानकातील सर्व प्रवेशद्वारांवर कार्ड रीडर बसवण्यात येणार आहेत. प्रवास करणा-यांना कार्ड रीडवर कार्ड टॅप करावे लागेल. केलेल्या प्रवासानुसार, कार्डमधून पैसे वजा होतील आणि तुम्हाला तिकीट मिळेल. त्यानंतर तुम्ही एकाच तिकिटावर मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टने प्रवास करु शकता.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here