BMC : मुंबईत ते २२ हजार फेरीवाले केवळ मतदार, पण पात्र नाही

267
BMC : मुंबईत ते २२ हजार फेरीवाले केवळ मतदार, पण पात्र नाही
BMC : मुंबईत ते २२ हजार फेरीवाले केवळ मतदार, पण पात्र नाही

मुंबईमध्ये तब्बल १० हजार ३३० परवाना धारक फेरीवाले असून २०१४च्या सर्वेमध्ये अर्ज केलेल्या ९९ हजार अर्जदारांपैंकी केवळ २२ हजार ४८ फेरीवाले मतदानास पात्र ठरले आहे. हे सर्व मतदार टाऊन वेंडींगवर आपले सदस्य निवडून पाठवणार आहे. त्यामुळे निवडून आलेले फेरीवाल्यांचे सदस्य आणि महापालिकेचे अधिकारी अशाप्रकारची टाऊन वेंडींग समिती ही फेरीवाल्यांच्या पात्रतेबाबतच्या मार्गदर्शक सुचना तयार करणार आहे. मात्र, मतदानाचा अधिकार प्राप्त झालेले २२ हजार फेरीवाल्यांनाही नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार पात्रता सिध्द करावी लागणार आहे. त्यामुळे २२ हजार फेरीवाले हे पात्र नसून ते महापालिकेच्या लेखी मतदारच आहे.

मुंबई महापालिकेच्याच्या संकेत स्थळावर पथ विक्रेता म्हणून सिध्दता पूर्ण करणाऱ्या फेरीवाल्यांची यादी प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये २०१४च्या सर्वेतील पात्रतेसाठी निश्चित केलेल्या २२ हजार ४८ फेरीवाल्यांसह परवानाधारक १०हजार३३० स्टॉल्सधारकांसह फेरीवाल्यांचा समावेश टाऊन वेंडींग कमिटीच्या फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदार म्हणून केला आहे. येत्या १४ जुलै २०२३पर्यंत याबाबत हरकती व सूचना मागवण्यात येणार असून त्यातील हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यांचे निरसन करून नवीन सुधारीत यादी तयार केली जाईल. मात्र, यादीच्या बाहेरील नवीन नावाचा समावेश करण्यात येणार नाही.

त्यामुळे अंतिम मतदार यादी तयार करून कामगार आयुक्तांच्या कार्यालयाला सादर केली जाईल, त्याप्रमाणे फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची निवडणूक कामगार आयुक्तांमार्फत जाहीर केली जाईल. त्यामुळे फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींसह तयार झालेली टाऊन वेंडींग समिती ही फेरीवाल्यांच्या पात्रतेबाबतचे निकष तयार करतील. यामध्ये मतदार म्हणून भूमिका बजावणाऱ्या २२ हजार फेरीवाल्यांचीही नवीन निकषाप्रमाणे पात्रता निश्चित केली जाईल,असे अधिकाऱ्यांकडून समजते

अशाप्रकारे आहे विभाग निहाय २०१४च्या सर्वेतील पात्रतेसाठी निश्चित केलेल्या निकषात बसणारे फेरीवाले आणि अधिकृत परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या

शहर परिसर

ए विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या : १४५१, परवानाधारक फेरीवाले : १३५७

बी विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ५०९, परवानाधारक फेरीवाले : ४४८

सी विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या:७८९ , परवानाधारक फेरीवाले : ६५८

डी विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या:५३१ , परवानाधारक फेरीवाले : १०११

ई विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ४६४, परवानाधारक फेरीवाले : ४४०

एफ उत्तर विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ६२२, परवानाधारक फेरीवाले : ८००

एफ दक्षिण विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ३४८, परवानाधारक फेरीवाले : ४८८

जी उत्तर विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या १५६०, परवानाधारक फेरीवाले : ४६८

जी दक्षिण विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ४३०, परवानाधारक फेरीवाले : ५८७

(हेही वाचा – आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही, पण घुसलोच तर…; परिवाराच्या मुद्द्यावरून ठाकरे फडणवीस आक्रमक)

पश्चिम उपनगर परिसर

एच पूर्व विभाग : सन २०१४च्या सर्वेतील पात्र फेरीवाल्यांची संख्या: ५७३, परवानाधारक फेरीवाले : ३२१

एच पश्चिम विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ८९३, परवानाधारक फेरीवाले : ८७१

के पूर्व विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: १५१५, परवानाधारक फेरीवाले : ४९४

के पश्चिम विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: १९९१ , परवानाधारक फेरीवाले : ४७८

पी उत्तर विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: १०५५, परवानाधारक फेरीवाले : १६९

पी दक्षिण विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ३६५५, परवानाधारक फेरीवाले : १५२

आर मध्य विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ७७४, परवानाधारक फेरीवाले : १६७

आर उत्तर विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: २३९, परवानाधारक फेरीवाले : ४८

आर दक्षिण विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ६८३, परवानाधारक फेरीवाले १५३

पूर्व उपनगर परिसर

एल विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ८६६, परवानाधारक फेरीवाले : १९३

एम पूर्व विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: २१५, परवानाधारक फेरीवाले : १३३

एम पश्चिम विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या : ५७४, परवानाधारक फेरीवाले : १७९

एन विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: १२९१, परवानाधारक फेरीवाले : २२१

एस विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ३५३, परवानाधारक फेरीवाले : ३७७

टी विभाग : सन २०१४च्या सर्वेतील फेरीवाल्यांची संख्या: ६६६, परवानाधारक फेरीवाले : १२०

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.