मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation)मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. आणि याच्याच निषेधार्थ रविवारी राज्यातील अनेक भागात आंदोलन तसेच बंद पुकारण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रविवारी सकाळी मुंबईतील दादर येथील प्लाझा सिनेमा च्या मराठा क्रांती संघटनांकडून आंदोलन केले. याशिवाय मरीन ड्राईव्ह परिसरात ठाकरे गटाच्या माध्यमातून मोर्चा काढला होता. दादर,घाटकोपर,बदलापूर या ठिकाणीही आंदोलन करण्यात आले. नांदेड मध्ये एसटी बस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही त्याचा फटका सहन करावा लागला. ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
(हेही वाचा : IND vs PAK Asia Cup : पावसामुळे रंगाचा बेरंग, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द)
३५० आंदोलकांविरुद्ध गुन्हा
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेत असताना आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी ३५० आंदोलकांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांनी जरांगे यांना रुग्णालयात नेण्यास विरोध केला. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांनी पोलिसांची कारही जाळली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून हृषिकेश बेंद्रे, श्रीराम कुरणकर, राजू कुरणकर, संभाजी बेंद्रे, महारुद्र अंबरुळे, राजेंद्र कोटुंबे, भागवत तारख, दादा घाडगे, पांडुरंग तारख, अमोल पंडित, किरण तारक, अमोल लहाने, वैभव आवटे, किशोर कटारे, अविनाश मांगदरे, मयूर आवटे यांच्यासह ३०० ते ३५० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community