स्वच्छतागृहांमध्ये आता महिला सुरक्षारक्षक; न्यायालयाची शिफारस

176

सार्वजनिक स्वच्छतागृहांचा लहान मुले आणि आणि महिलांना वापर करावा लागतो. त्यामुळे अशा ठिकाणी महिला आणि लहान मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी आता स्वच्छतागृहांमध्ये सुरक्षारक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. महिला सुरक्षारक्षक सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये नियुक्त करण्याची शिफारस विशेष पाॅक्सो न्यायालयाने केली आहे.

2016 मध्ये सार्वजनिक शौचालयात 7 वर्षांच्या मुलीचे चुंबन घेतल्याबद्दल एका सफाई कामगाराला दोषी ठरवून पाच वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या निकालात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

अशा घटनांमध्ये झपाट्याने वाढ

स्वच्छतागृहांमध्ये महिला सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे किंवा लहान मुलांनी त्यांच्याजवळच्या माणसांसोबत असायला हवे. एवढ्या कोवळ्या वयात त्यांना कोणत्याही हल्लेखोरांकडून त्रास होऊ नये. या त्रासाला त्यांच्या आयुष्यभर जखमा भरुन निघत नाहीत. मुलांचा मानसिक छळही होतो, अशा घटना झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना सार्वजनिक शौचालयात पाठवताना काळजी घेणे आवश्यक आहे, असे निरिक्षण विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एच.एस. शेंडे यांनी नोंदवले.

( हेही वाचा :पुणे तिथे काय उणे? आपल्या सांस्कृतिक राजधानीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी या ठिकाणांना आवर्जून भेट द्या…)

आरोपीचा युक्तिवाद फेटाळला

स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी मुलीला स्वच्छतागृहातून बाहेर काढले होते, असा आरोपीचा युक्तीवाद न्यायालयाने फेटाळला आरोपीन अल्पवयीन पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले आणि तिचा विनयभंग केला. तिला धमक्याही दिल्या, हे सरकारी वकिलांनी सिद्ध केले आहे, असे न्यायालयाने म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.