माळीण दुर्घटनेनंतर दरडी कोसळण्याच्या घटनांची पूर्वसूचना सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) संस्थेतर्फे सतर्क या उपक्रमातून देण्यात येत आहे. या उपक्रमाचे संशोधन लॅंड या आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे. ही सर्व यंत्रणा सतर्कने नागरी सहभागातून उभारली आहे. त्यामुळे तिचे महत्त्व अधिक आहे.
यांनी उभारली यंत्रणा
याबाबत संस्थेचे उपाध्यक्ष आणि हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, सीसीएस आणि टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे सतर्कने संकलित माहितीच्या आधारावर संशोधन सादर केले. यात नागरिक, हवामान शास्त्रज्ञ आणि भूगर्भ शास्त्रज्ञांनी ही यंत्रणा उभारली. या शोधनिबंधात टेक्सास विद्यापीठातील डॉ. विनय कुमार आणि डॉ. कुलकर्णी या शास्त्रज्ञांसह मयुरेश प्रभुणे, स्नेहा कुलकर्णी, मिताली इनामदार, नितीन ताम्हणकर, स्पंदन वाघमारे, किरण ठोंबरे, परेश म्हेत्रे, तनुजा खटावकर, यशोधन पानसे, अमेय पटवर्धन, योगिनी सोमण, प्रसाद भगत, सुमित भाले आदी सिटीझन सायंटिस्टचा सहभाग आहे.
( हेही वाचा: आर्थर रोड तुरुंगात घडला घृणास्पद प्रकार, कैद्याकडून कैद्यावर बलात्कार )
Join Our WhatsApp Community