कोरोना JN.1च्या नवीन व्हेरियंटमुळे संपूर्ण देशभरात चिंता वाढली आहे. JN.1 व्हेरियंटमुळेच कोविड रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे.तर ठाण्यातही कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटचा शिरकाव झाला असून JN.1 या नव्या व्हेरियंटचे एकाच दिवसात JN.1 व्हेरियंटचे संशयित पाच रुग्ण आढळले आहेत. या पाच रुग्णांमध्ये एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे ठाण्यातील रुग्णांची संख्या २८ वर पोहचली आहे. त्यामुळे एकंदरीतच ठाणेकरांची चिंता वाढली आहे.तर देशात ६५६ रुग्णांची नोंद झाली आहे. ३७४२ सक्रिय रुग्ण सध्या उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (JN.1 update )
ठाण्यात आढळलेल्या रुग्णांपैकी दोन जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना JN.1च्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. तर हा व्हेरियंट ओमायक्रोन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट आहे. JN.1व्हेरियंटचा पहिला रुग्ण२५ ऑगस्ट २०२३ रोजी आढळला होता. केरळमध्ये कोरोनाचा सब-व्हेरियंट JN.1चा रुग्ण आढळून आला. राज्यात २४ डिसेंबर रविवारी नऊ JN.1 व्हेरियंटच्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १५३ वर गेली आहे. (JN.1 update )
खबरदारी म्हणून मास्क वापरा
केरळ, कर्नाटक,तामिळनाडू महाराष्ट्र गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीची उपाय योजना म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. तसेच लहान मुले व जेष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
देशात एका दिवसात ६५६रुग्णांची नोंद
भारतात आतापर्यंत ६५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मृतांचा आकडा ३७४२ वर पोहोचला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशात गेल्या २४ तासांत या संसर्गामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक १२८ कोविडचे रुग्ण केरळमधून सापडले आहेत. त्यापाठोपाठ ९६ प्रकरणांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, ओडिशामध्ये गेल्या २४तासांत एक कोविड रुग्ण आढळला आहे. एकूण दोन रुग्ण आढळले आहेत. केंद्र आणि राज्यांनी नवीन कोविड प्रकार J N.1 बद्दल चिंता व्यक्त केली आहे. या नवीन प्रकाराची प्रकरणे केवळ भारतातच नव्हे तर सिंगापूर आणि इंग्लंडसारख्या इतर देशांमध्येही आढळली आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community