मागच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात काॅटनच्या किमतीत 20 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली असून, देशातही काॅटनची किंमत 10 टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे लवकरच रेडिमेड कपडे स्वस्त होणार असून, सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
2022 च्या अखेरपर्यंत देशात काॅटनचा दर 30 हजार रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे. तर विदेशी बाजारात काॅटनचे दर घसरुन जवळपास 45 हजार रुपयांच्या स्तरावर येण्याची शक्यता आहे. यामुळे काॅटन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत, कपडे स्वस्त होणार आहेत. सध्या काॅटनच्या दरातील घसरणीनंतर, कापूस आणि सुती धाग्यांची मागणी कमी झाली असून, त्याला खरेदीदार मिळत नाहीत.
( हेही वाचा: आता विमातळावर बॅगांची तपासणी होणार झटपट )
कशामुळे होतेय दरात घसरण
- मागणीमध्ये झालेली घसरण, डाॅलरच्या तुलनेत रुपयाने खाल्लेली गटांगळी, कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता तसेच जगभरात मंदी येण्याची भीती यामुळे काॅटनच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे.
- किमतीवरील हा दवाब पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाला तर मात्र कापसाचे उत्पादन कमी होऊन दर वाढण्याची शक्यता आहे.