Dahisar-bhayandar road project : दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग प्रकल्पात ‘या’ कामांसाठी वाढला २६५ कोटींचा खर्च

165

मुंबईकरांसाठी रस्ते वाहतुकीसाठी विनाअडथळा आणि सिग्नल विरहीत असा दहा मिनिटात अंतर गाठण्याचा उत्तम पर्याय मुंबईतील पश्चिम उपनगरात दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता लागणाऱ्या विविध घटकांच्या बांधणीकरिता कास्टिंग यार्डची आवश्यकता आहे. त्यामुळे कास्टींग यार्डसाठी तब्बल २६५ कोटी रुपये खर्च होणार आहे, त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च तब्बल २६५ कोटींनी वाढल्याचे दिसून येत आहे

या  प्रकल्प कामांसाठी एल एण्ड टी यांनी बोली लावलेल्या स्थापत्य कामांच्या रकमेसोबत इतरही रकमेचा प्रकल्पाच्या सविस्तर अंदाजित खर्चामध्ये समावेश केलेला आहे. ज्यात १८ टक्के जीएसटी, आकस्मिक खर्च आणि तात्पुरती रक्कम, सानुग्राह अनुदान, कंत्राटावरील दरवृद्धी, कास्टिंग यार्ड व इतर संलग्न सुविधांकरिता लागणाऱ्या जागेचे भाडे इत्यादी १ हजार ३२३ कोटी रकमेची तरतूद केली आहे. कंत्राटदार लार्सन एण्ड टुब्रो यांच्यासोबत करार करावयाची किंमत ३ हजार ३०४ कोटी रूपये एवढीच असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

Dahisar-bhayandar road project हा  प्रकल्प व्यापक स्वरूपाचा पायाभूत प्रकल्प असल्याने तो वेळेत पूर्ण करण्याकरिता लागणाऱ्या विविध घटकांच्या बांधणीकरिता कास्टिंग यार्डची आवश्यकता आहे. जर कंत्राटदाराने कास्टिंग यार्डसाठी जमिनीची व्यवस्था केली असेल तर त्या जमिनीच्या भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेची तरतूद केली आहे. तसेच निविदेमधील अटीनुसार जर महानगरपालिकेने कास्टिंग यार्डसाठी लागणारी जमीन उपलब्ध करून दिली तर कंत्राटदारास २६५.१ कोटी रूपयांची रक्कम द्यावी लागणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

प्रत्यक्षात या प्रकल्पासाठी १९९८.२२ कोटी रुपये हा कार्यालयीन अंदाज असून कंत्राटदाराने १९८१ कोटी रुपयांमध्ये निविदा बोली लावलेली आहे.  कार्यालयीन अंदाजा पेक्षा उणे ०.८६ टक्के कमी आहे. भविष्यात उद्वणाऱ्या आकस्मित आवश्यक कामासाठी तसेच किमतीतील होणाऱ्या चढ उतारासाठीची तरतुद व १८% वस्तू व सेवा कर, भौतिक सदिलवार, तात्पुरती रक्कम, व्यय सदिलवार व इतर खर्च इत्यादीसाठीची रक्कम मिळून प्रकल्पाची तपशीलवार अंदाजित खर्चाची रक्कम ४ हजार २७ कोटी रूपये एवढी झाली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

(हेही वाचा Khalistani : खलिस्तानी अतिरेकी पन्नूवर कॅनडात प्रवेश बंदी करा; कॅनडातील हिंदूंची सरकारकडे मागणी)

शासकीय नियमाप्रमाणे १८ टक्के वस्तू व सेवा कर लक्षात घेवून तरतूद करावी लागते. त्यानुसार, सदर प्रकल्पामध्ये अंदाजे ३५६.५८ रुपयांचा वस्तू व सेवा कर द्यावा लागेल, असा अंदाज आहे. या प्रकल्पामध्ये ३ वर्षांचे बांधकाम, त्यानंतर ३ वर्षांचे परिरक्षण या सर्वांसाठी अंदाजे ३५०.६४ कोटी रुपयांची किंमत सादिलवार (Cost Contingency / Price Escalation) ची तरतूद केलेली आहे. प्रकल्पामध्ये जल आकारासाठी रुपये २१५ कोटी तर मलनिःसारण आकारापोटी रुपये १०७.५ कोटी इतकी तरतूद केली आहे.

प्रकल्प पूर्ण होवून त्याचा वापर सुरु झाल्यानंतर महानगरपालिका देखील एकूणच सर्व कामांचे पर्यवेक्षण (supervision) करीत असते. त्यासाठी मनुष्यबळ, वाहने, इतर यंत्रणा नियुक्त करण्यात येते. यानुसार सदर प्रकल्प खर्चाच्या एकूण १० टक्के याप्रमाणे २६८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नियमित आकारण्यात येणारे पाणी आकार, मलनिःसारण, पर्यवेक्षण आकार इत्यादी विविध आकारांचा प्रकल्पाच्या मूळ अंदाजित खर्चामध्ये समावेश नसतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार महानगरपालिकेवर येत नाही किंवा ही रक्कम कंत्राटदारास दिली जात नाही.

प्रकल्पाच्या खर्चामध्ये विविध प्राधिकरण शुल्क म्हणजे पर्यावरणीय, शासकीय, वैधानिक संस्थांना द्यावे लागणारे शुल्क, सल्लागार शुल्क (जसे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, त्रयस्थ व्यवस्थापन सल्लागार, त्रयस्थ लेखा सल्लागार, आयआयटी मुंबई) इत्यादींकरिता एकूण १३२ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद प्रकल्पाकरिता लागणाऱया विविध पर्यावरणीय ‘ना हरकत’ प्रमाणपत्र, शुल्क व त्रयस्थ लेखा सल्लागार जसे आयआय़टी मुंबई यांना देय असलेले शुल्क याकरिता तरतूद करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.