घटत्या रुग्णसंख्येत दोन दिवसांत कोरोनाचे १४ बळी

गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या उपचारांदरम्यान १४ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटते आहे. राज्यात १२ हजार ७७ इतके कोरोनाची रुग्णसंख्या नोंदवली गेली. घटत्या रुग्णसंख्येसह बरे होण्याचा टक्का ९८.०१ टक्क्यांवर नोंदवला गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
गुरुवारी राज्यात १ हजार ८६२ नवे कोरोना रुग्ण विविध भागांतून नोंदवले गेले. त्या तुलनेत २ हजार ९९ कोरोना रुग्णांना डिस्चार्जनंतर घरी सोडण्यात आले. मात्र सलग दोन दिवस दर दिवशी सात रुग्णांचा मृत्यू झाल्यानेही कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाब चिंता व्यक्त करण्यात आली. बुधवारी मुंबई, ठाण्यात, पिंपरी-चिंचवड, सातारा, सोलापूरात तसेच कोल्हापूर आणि परभणी या जिल्ह्यांत प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. गुरुवारी मुंबईत २, ठाण्यात १, पुण्यात आणि साता-यात प्रत्येकी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात केवळ तीन जिल्ह्यांत हजारीपार रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. पुण्यात ३ हजार ३८६, मुंबईत २ हजार २३५ आणि नागपूरात १ हजार ३०६ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here