कोरोना काळात अनेकांच्या नोक-या गेल्या. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा क्षेत्रात पुढील काही वर्षांमध्ये तब्बल 1.2 कोटी नोक-या उपलब्ध होणार आहेत. तसेच, देशातील कर्माचा-यांच्या पगारातही 9.1 टक्क्यांनी वाढ होणार आहे. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नोकरीच्या संधीत होणार वाढ
संशोधनानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवांचे योगदान वाढणार आणि नोक-यांमध्ये लक्षणीय वाढ होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना आणि परकीय थेट गुंतवणूक यामुळे मागणी वेगाने वाढत आहे. अहवालानुसार, अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवांमध्ये 25 ते 27 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा: आता मुंबईतील ‘या’ 19 गर्दीच्या स्थानकांमध्ये होणार एकमजली स्टेशन! )
इतकी होणार पगार वाढ
2022मध्ये भारतातील कर्मचा-यांच्या पगारात सरासरी 9.1 टक्क्यांनी वाढ होणार आहे. 2021मध्ये सरासरी पगार वाढ 8 टक्के होती. 2022 मध्ये सर्वच संस्था पगार वाढवण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे 2022 मध्ये 34 टक्के संस्था त्यांच्या कर्मचा-यांना दुहेरी अंक वेतनवाढ देण्याची योजना आखत आहेत.