मुंबईत दुचाकीवरील सहप्रवाशाला सुद्धा हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात विनाहेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्या आणि विना हेल्मेट मागे बसणाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आणि ३ महिन्यांसाठी परवाना रद्द करण्यात येणार आहे. परंतु मुंबईत दुचाकीचालक व सहप्रवासी दोघांनाही हेल्मेटसक्तीचे करण्याचे कारण काय आणि अन्य कोणत्या राज्यात अशी हेल्मेटसक्ती करण्यात आलेली आहे याविषयी आपण जाणून घेऊया…
( हेही वाचा : भाडे थकवणाऱ्या आणि रखडलेल्या एस आर ए योजनेतील विकासकांवर होणार कारवाई)
अन्य कोणत्या भागात दोघांना हेल्मेटसक्ती?
दिल्लीमध्ये गेली अनेक वर्षे दुचाकीवर बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती आहे. बंगळुरू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट वापरणे बंधनकारत असल्याचा आदेश लागू करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश सरकारने नोव्हेंबर २०२० मध्येच दोघाप्रवाशांनाही हेल्मेट वापरणे बंधनकारक केले होते. तर चेन्नई शहरात लवकरच याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.
सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी…
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय आणि वाहन चालकांच्या सुरक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या म्हणण्यानुसार, हेल्मेटसक्तीमुळे अपघातांच्या प्रमाणात घट झाली आहे. दुचाकीवर हेल्मेटशिवाय मागे बसलेल्या प्रवाशांचे जखमी वा मृत होण्याचे प्रकार वाढले आहेत. चेन्नई शहरात गेल्या वर्षी ६११ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला त्यात १३५ जण हे मागे बसलेले सहप्रवासी होते. त्यामुळे दुचाकी चालवणाऱ्या सोबत सहप्रवाशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community