मंजुरीनंतर मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन दहा महिन्यांनी : बायोगॅसपासून वीज निर्मितीसह गाळावरही प्रक्रिया

मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई मलनिःसारण प्रकल्प या खात्याद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे. या अंतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज २४६.४० कोटी लीटर अर्थात २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया करण्याची असणार आहे. कार्याअंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहेत. यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मितीही केली जाणार आहे. तर बाहेर पडणाऱ्या गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : सिद्धार्थ महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय; मंजुरीनंतर पाच महिन्यांनी भूमिपूजनाचा मुहूर्त)

महानगरपालिकेकडून मुंबई महानगरात वरळीमध्ये (५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन), वांद्रे येथे (३६० दशलक्ष् लीटर प्रतिदिन) मालाडमध्ये (४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन) घाटकोपरमध्ये (३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन) धारावीमध्ये (४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) भांडुपमध्ये (२१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि वेसावे (वर्सोवा) येथे (१८० दशलक्ष लीटर प्रतिदिन) याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणे नियोजित आहे. त्यासाठी सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार भांडुप वगळता उर्वरीत सर्व केंद्रांच्या प्रस्तावांना प्रशासकांची मंजुरी प्राप्त झाली होती. या प्रकल्पाचे काम चार वर्षांमध्ये पूर्ण करायचे असून त्यापुढील १५ वर्षांची देखभाल अशाप्रकारे एकूण १९ वर्षांचा कालावधी या प्रकल्पासाठी असेल. पूर्वी १५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता, परंतु आता हा खर्च विविध करांसह २६ कोटींच्या घरांमध्ये पोहोचला.

या सर्व मल जल प्रक्रिया केंद्रांचे प्रस्ताव मार्च महिन्यात मंजूर करण्यात आले असून एकमेव भांडुप मल जल प्रक्रिया केंद्राचा प्रस्ताव प्रशासकांनी मंजूर केला आहे. या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे फोर्ट, भायखळा, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), गांवदेवी, हाजीअली, प्रभादेवी, दादर, वरळी, माहीम, वांद्रे, खेरवाडी, वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी), सांताक्रुझ, माटुंगा, वडाळा, शीव – कोळीवाडा, ब्राह्मणवाडी, अंधेरी पूर्व, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पूर्व, जुहू, विलेपार्ले पश्चिम, ओशिवरा, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगांव, घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड आदी परिसरातील लोकसंख्येला फायदा होणार आहे. या मलजल प्रक्रिया केंद्रांसाठी रुपये १७ हजार १८२ कोटी इतका खर्च अपेक्षित असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. या कार्याअंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहेत. यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मितीही केली जाणार आहे. तर बाहेर पडणाऱ्या गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे.

मलजल प्रक्रिया केंद्रांसाठी कोणत्या कंत्राटदाराची निवड, किती कोटींची बोली

भांडुप मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : २१५दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : आयडब्ल्यूआयएल-ओएमआयएएल-एसपीएमएल ही संयुक्त भागीदारी
कंत्राट किंमत : सुमारे १२६२ कोटी रुपये

धारावी मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : ४१८ दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : मेसर्स वेलस्पन ही संयुक्त भागीदारीतील कंपनी
कंत्राट किंमत : सुमारे ४६०० कोटी रुपये आणि विविध करांसह ७५०० कोटी रुपयांमध्ये

वरळी मलजल प्रक्रिया केंद्र :

प्रतिदिन क्षमता : ५०० दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : सुएझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व सुएझ इंटरनॅशनल ही कंपनी
कंत्राट किंमत : सुमारे ५८०० कोटी रुपये आणि विविध करांसह ९३०० कोटी रुपये

मालाड मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : ४५४ दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : सीसी लिमिटेड ही कंपनी
कंत्राट किंमत : सुमारे ६३७० कोटी रुपये आणि विविध करांसह १०,४५० कोटी रुपये

घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : ३३७ दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : जीव्हीपीआर इंजिनिअर्स लिमिटेड,
कंत्राट किंमत : सुमारे २५५० कोटी रुपये आणि विविध करांसह ४०७० कोटी रुपये

वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : ३२५ दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : लार्सन अँड टुब्रो
कंत्राट किंमत : सुमारे ४२९३ कोटी रुपये आणि विविध करांसह ६८७० कोटी रुपये

वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्र

प्रतिदिन क्षमता : १८० दशलक्ष लीटर
निवड झालेल्या कंत्राटदाराचे नाव : सीसी लिमिटेड ही कंपनी
कंत्राट किंमत : सुमारे १६०० कोटी रुपये आणि विविध करांसह २५७० कोटी रुपये

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here