पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारताच्या मदतीने ३ विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन करणार आहेत. अखौरा-अगरतला सीमापार रेल्वे मार्ग, खुलना-मोंगला बंदर रेल्वे मार्ग आणि मैत्री सुपर थर्मल पॉवर प्लांटचे युनिट-2 हे तीन प्रकल्प आहेत.
अखौरा-अगरतला सीमापार रेल्वे जोडणी प्रकल्प तयार करण्यात आला आहे. भारत सरकारने बांगलादेशला 392.52 कोटी रुपये दिले. बांगलादेशमध्ये 6.78 किमी लांबीच्या दुहेरी गेज रेल्वे मार्गासह आणि त्रिपुरामध्ये 5.46 किमी लांबीच्या रेल्वे मार्गासह रेल्वे जोडणीची एकूण लांबी 12.24 किमी आहे.
(हेही वाचा – Kolhapur : गळीत हंगामाचा शुभारंभ, साखर कारखान्यांची धुरांडी पेटणार)
खुल्ना-मोंगला बंदर रेल्वे मार्ग प्रकल्प भारत सरकारच्या सवलतीच्या कर्ज सुविधेअंतर्गत तयार करण्यात आला आहे, ज्याचा एकूण प्रकल्प खर्च 388.92 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. या प्रकल्पात मोंगला बंदर आणि खुल्नामधील विद्यमान रेल्वे जाळ्यामधील सुमारे 65 किमीच्या ब्रॉड गेज रेल्वे मार्गाचे बांधकाम समाविष्ट आहे. यासह, बांगलादेशातील दुसरे सर्वात मोठे बंदर मोंगला ब्रॉड गेज रेल्वे जाळ्याशी जोडले गेले आहे.
बांगला देशातील ऊर्जा सुरक्षा वाढीसाठी
1.6 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या भारतीय सवलतीच्या वित्तपुरवठा योजनेच्या कर्जांतर्गत, मैत्री सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्प हा बांगला देशातील खुलना विभागातील रामपाल येथे स्थित 1320 मेगावॅट (2×660) सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्प (एमएसटीपीपी) आहे. हा प्रकल्प बांगलादेश-भारत मैत्री पॉवर कंपनी (प्रायव्हेट) लिमिटेडने राबवला आहे. ही भारतातील एनटीपीसी लिमिटेड आणि बांगला देश ऊर्जा विकास मंडळ (बीपीडीबी) यांच्यातील संयुक्त उपक्रम कंपनी आहे. दोघांचाही त्यात वाटा आहे. मैत्री सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या युनिट-1 चे अनावरण दोन्ही पंतप्रधानांनी सप्टेंबर 2022 मध्ये संयुक्तपणे केले होते आणि युनिट-2 चे उद्घाटन आज होणार आहे. मैत्री सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कार्यन्वित झाल्यामुळे बांगलादेशातील ऊर्जा सुरक्षा वाढेल. या प्रकल्पांमुळे या भागातील संपर्क आणि ऊर्जा सुरक्षा बळकट होईल.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community