- मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) व्याप्ती वाढविण्यात आली असून राज्यातील ९५ आणि राज्या बाहेरील १५ अशा आणखी ११० तीर्थ क्षेत्रांचा नव्यावे समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील ६६ आणि महाराष्ट्राच्या बाहेरील ७३ तीर्थ क्षेत्रांचा समावेश योजनेत केला होता.
(हेही वाचा – Love Jihad : हिंदू तरुणी ठरली आसिफच्या वासनेची शिकार; धर्मांतरासाठी आसिफ आणि मोहसिनचा दबाव)
राज्य सरकारने सर्व धर्मीय नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) राबवली जात आहे. या योजनेद्वारे अडीच लाख रुपयांपेक्षा अल्प वार्षिक उत्पन्न असलेल्या ६० वर्षे आणि त्यावरील वयोगटाच्या नागरिकांना तीर्थ क्षेत्रांचे विनामूल्य दर्शन घडविण्यात येत आहे. एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रतिव्यक्ती ३० हजार रुपयांपर्यंत या योजनेत खर्च निश्चित केला आहे. प्रवास, भोजन, निवास आदी सर्व व्यवस्था राज्य शासनाकडून केली जाते.
(हेही वाचा – Baba Siddique Death : बाबा सिद्दिकी हत्येशी शाहिद बलवांचा संबंध काय? शाहिद बलवा कोण आहेत?)
महाराष्ट्रातील तीर्थ क्षेत्रांत (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) शिवनेरी (पुणे) गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ, तसेच रायगडावरील शिवराज्याभिषेक स्थळ यांचा समावेश केला आहे. यासह सातारा जिल्ह्यातील श्री गोंदवलेकर महाराज यांचे गोंदवले हे स्थान, रायगडमधील महाड येथील चवदार तळे, नागपूचे रामटेक, पुण्यातील भिडेवाडा, वाशीमची पोहरादेवी, जळगाव येथील पाटणादेवी मंदिर, सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिर आदी स्थानाचा नव्याने समावेश केला आहे. तर उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ला, कर्नाटकमधील मायाक्का देवी मंदिर, बिहार येथील गौतम बुद्धांची साधना भूमी, गुजरातमधील संखेश्वर तीर्थ आदी महाराष्ट्राच्या बाहेरील तीर्थ क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community