Hasan Mushrif : रुग्णालय प्रशासनात सैन्य दलाच्या माजी अधिकाऱ्यांचा समावेश; हसन मुश्रीफ यांचे सूतोवाच

मुंबईतील खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात प्रशासन आणि वैद्यकीय सेवा हे दोन विभाग वेगवेगळे करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी प्रशासन विभागात सैन्य दलातील माजी अधिकाऱ्यांचा समावेश केला जाईल. असे मुश्रीफ यांनी सांगितले.

324
Hasan Mushrif यांच्या पाठपुराव्याला यश; आठ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

मुंबईतील खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात प्रशासन आणि वैद्यकीय सेवा हे दोन विभाग वेगवेगळे करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी प्रशासन विभागात सैन्य दलातील माजी अधिकाऱ्यांचा समावेश केला जाईल. त्यामुळे प्रशासकीय विभागाला प्रशासनाशी संबंधित काम करता येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी बुधवारी (२० डिसेंबर) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. (Hasan Mushrif)

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालयात विविध साहित्य खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत काँग्रेसच्या सुभाष धोटे यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नावरील चर्चेत सरकारी रुग्णालयातील दुरावस्थेचा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी बोलताना मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर प्रशासकीय आणि वैद्यकीय विभाग वेगळा करण्याचा आपला मनोदय बोलून दाखवला. (Hasan Mushrif)

(हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सभागृहात नाही बाहेर बोलतात; देवेंद्र फडणवीस यांचा टोला)

पीपीपी तत्वावर सिटीस्कॅन आणि पॅथॉलॉजीची सुविधा

रुग्णालयाला लागणारी औषधे आणि सर्जीकल साहित्याची खरेदी करण्यासाठी नवीन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत रुग्णालय अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना ४० टक्क्यांपर्यंत औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयात औषध मिळत नाही, अशी एकही तक्रार येणार नाही, असे मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले. (Hasan Mushrif)

तसेच सरकारी दवाखान्यात सार्वजनिक, खासगी भागीदारी (PPP) तत्वावर सिटीस्कॅन आणि पॅथॉलॉजीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. रुग्णांना सरकारी दरात या सुविधा मिळतील, असेही मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे, शरद पवार गटाचे अनिल देशमुख, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आदींनी उपप्रश्न विचारले. (Hasan Mushrif)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.