Income Tax Bill 2025 : नवीन आयकर विधेयकासाठी आता गुरुवारचा मूहूर्त

Income Tax Bill 2025 : १३ फेब्रुवारीला संसदेत हे विधेयक सादर होईल

39
Income Tax Bill 2025 : नवीन आयकर विधेयकासाठी आता गुरुवारचा मूहूर्त
Income Tax Bill 2025 : नवीन आयकर विधेयकासाठी आता गुरुवारचा मूहूर्त
  • ऋजुता लुकतुके 

केंद्रीय अर्थसंकल्पात सुतोवाच केलेलं नवीन आयकर विधेयक येत्या गुरुवारी संसदेत सादर होईल असं आता बोललं जात आहे. हे विधेयक १९६१ च्या जुन्या कायद्याची जागा घेईल. नवीन विधेयकात कर रचना आणि विवरण पत्र भरण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यात आल्याचं बोललं जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना तसं बोलून दाखवलं होतं. पण, त्यानंतर मागचे १० दिवस गेले तरी हे विधेयक अजून संसदेत सादर झालेलं नाही. ७ फेब्रुवारीला विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. (Income Tax Bill 2025)

(हेही वाचा- Maghi Ganeshotsav 2025 : माघी गणेशोत्सवावरून आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल)

विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विविध तज्ज गटांकडून त्याचं सविस्तर परीक्षण व्हावं अशी सरकारची इच्छा आहे. आताही विधेयकाच्या आढाव्यासाठी ते संसदेच्या समितीकडे पाठवलं जाणार असल्याचं समजतंय. ‘संसदीय विशेष समिती विधेयकाचं परीक्षण करून आपले प्रस्ताव सादर करते. मग विधेयक पुन्हा मंत्रिमंडळासमोर येतं. आणि सुचवलेले बदल स्वीकारायचे की नाही यावर निर्णय होऊन विधेयकाचा मसुद्याला अंतिम स्वरुप दिलं जातं,’ असं सीतारमण यांनी प्रक्रिया समजावून सांगताना म्हटलं होतं. (Income Tax Bill 2025)

जुलै २०२४ च्या संपूर्ण अर्थसंकल्पातच केंद्रसरकारने १९६१ च्या आयकर कायद्याचा फेरआढावा घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. आणि त्यासाठी विशेष समिती नेमून खर्चाची तरतूदही केली होती. नवीन आयकर कायदा समजायला सोपा आणि सुटसुटीत असावा अशी केंद्रसरकारची इच्छा आहे. मागच्या काही वर्षांत केंद्रसरकारने आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेत काही सुधारणा केल्या आहेत. स्वप्रमाणित विवरणपत्र स्वीकारण्याची सोय, करदात्याची ओळख ऑनलाईन पटवण्यासाठी केलेली ‘फेसलेस’ सोय, आयकर परतावा झटपट देण्यासाठी प्रक्रियेचं सुलभीकरण तसंच विवादसे विश्वास तर योजने अंतर्गत जुनी प्रकरणं निकालात काढण्यात दाखवेलली तत्परता अशा सुधारणांना करदात्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. (Income Tax Bill 2025)

(हेही वाचा- भारताचे जबरदस्त फलंदाज Gundappa Viswanath यांचा जन्मदिन; जाणून घ्या त्यांच्याबद्दलची खास वैशिष्ट्ये)

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी नवीन कर प्रणालीत १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं आहे. तर करांचे नवीन दरही लागू केले आहेत. आता विवरणपत्र भरण्याची प्रक्रियाही सुलभ करणं हा नवीन विधेयकामागचा हेतू आहे. (Income Tax Bill 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.