पीएफआयच्या मिळकतीवर आयकर विभागाने काय केली कारवाई? वाचा… 

'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'वर देशात समाजविरोधी कृत्य करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या संस्थेवर बंदी आणण्याची मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाला करण्यात आली आहे. 

असंख्य समाजविरोधी कृत्य करणारी इस्लामिक संस्था पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आता या संस्थेला पैसा जमा करणे कठीण जाणार आहे. अशा प्रकारची कारवाई साधारणपणे कोणत्याही संस्थेवर होत नाही. त्यामुळे या कारवाईचे महत्व अधिक आहे. या संस्थेचा समाजात द्वेष पसरवून अशांतता निर्माण करणे हाच प्रत्येक कृतीमागील हेतू असतो, म्हणून पीएफआयच्या असामाजिक कृत्यांविरुद्धची वृते ‘हिंदुस्थान पोस्ट’वर कायम प्रसिद्ध करत असते.

आयकर विभागातर्फे खासगी स्वयंसेवी संस्थांना जर दान स्वरूपात अधिक निधी मिळायचा असेल त्यांना दिल्या जाणाऱ्या दानाच्या रकमेवर आयकर सूट देण्याचे प्रावधान आहे. ही सूट आयकर कायद्याच्या कलम १२एए अंतर्गत दिली जाते. परंतु दीर्घकाळापासून समाजविरोधी कृत्य करणाऱ्या पीएफआयला दिली जाणारी ही सूट काढून घेण्यात आली आहे. ज्या संस्था देशविरोधी कृत्य करतात, काळेधन प्राप्त करतात अथवा आर्थिक गैरव्यवहार करतात किंवा आयकर नियमांचे उल्लंघन करतात, अशा संस्थांवर अशा प्रकारची कारवाई केली जाते.

(हेही वाचा : आता पीएफआयचा देशविघातक चेहरा होतोय उघड!)

कारवाईचे स्वरूप काय? 

आयकर विभागाने मार्चमध्ये हा आदेश काढला होता. ज्यामध्ये पीएफआयला दिली गेलेली आयकर सूट सुविधा काढून घेण्यात आली. या आदेशानंतर पीएफआयला मिळकतीवर मिळणारी आयकर सूट बंद होणार आहे. त्यामुळे यापुढे या संस्थेला २०१६-१७पासून मिळालेल्या पैशावर संपूर्ण आयकर भरावा लागणार आहे. आयकर विभागने आयकर कायदा १९६१ च्या कलम १२ एए (३) अंतर्गत ही कारवाई केली आहे. आयकर कायदा १९६१अंतर्गत कलम १२ एए च्या अंतर्गत वर्ष २०१२मध्ये पीएफआयला कर सूट मिळाली होती. मात्र या संस्थेची कृत्ये ही कायद्याच्या दृष्टीकोनातून अयोग्य ठरली असल्याने या संस्थेवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आता दान करणाऱ्यांनाही अडचण! 

पीएफआय संस्थेला दान करणारी व्यक्ती, संस्था यांनाही आता ते या संस्थेला दान करत असलेल्या रकमेवर आयकरात सूट मिळणार नाही. आयकर विभागाद्वारे पीएफआयला दिली जाणारी ८०जी ही सुविधाही काढून घेण्यात आली आहे. आयकर विभागाने आयकर कायदा  १९६१ अंतर्गत कलम १३(१)(बी) चे उल्लंघन केल्याकारणाने १२ ए ए (४)(ए) अंतर्गत ही कारवाई केली आहे. या सुविधेनुसार दात्याला दान केलेल्या एकूण रकमेवर ५० टक्के आयकर सूट दिली जाते. त्यामुळे आपोआपच या संस्थेला दान करणाऱ्या दात्यांची संख्या रोडवणार आहे.

(हेही वाचा : पीएफआय आणि तिच्या विभिन्न संस्था आहेत तरी कुठे? वाचा…   )

सामाजिक द्वेष पसरवण्याचा आरोप 

पीएफआय देशभरात सामाजिक द्वेष पसरवून त्याद्वारे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यासंबंधीचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ सतत प्रसिद्ध करत आहे. शाहीन बाग आंदोलन हे या संस्थेच्या अनेक कृत्यांपैकी एक आहे. यावरून या संस्थेवर बंदी घालण्याची मागणीही उत्तर प्रदेश सरकारने केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here