एका वर्षात बँकेत इतकी रक्कम जमा करताय? मग Income Taxच्या नियमात झालाय मोठा बदल

154

26 मे पासून इनकम टॅक्सच्या नियमांत मोठा बदल करण्यात आला आहे. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये व्यवहार करणा-यांसाठी हा बदल फार महत्वाचा आहे. एका आर्थिक वर्षात बँक किंवा पोस्ट ऑफिस अकाऊंटमध्ये 20 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा करणा-या व्यक्तीस आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड जमा करावे लागणार आहे.

(हेही वाचाः तो जेवायला जाताना पाकीट विसरला, म्हणून क्रेडिट कार्डचा जन्म झाला)

इनकम टॅक्स नियम(15वी सुधारणा), 2022 नुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसश्र(CBDT)ने हे नवे नियम जारी केले आहेत. 26 मे पासून हे नियम संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहेत.

  • जर एखादा खातेधारक एका आर्थिक वर्षात एक अथवा एकाहून अधिक खात्यांमध्ये 20 लाख किंवा त्याहून जास्त रोख रक्कम जमा करत असेल, तर त्याला आपले पॅन आणि आधार जमा करावे लागणार आहे.
  • तसेच एका आर्थिक वर्षात बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एका अथवा किंवा एकाहून अधिक खात्यांमधून 20 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यासही पॅन-आधार लिंक असणे आवश्यक आहे.
  • एखाद्याचे पॅन-आधार लिंक असले तरी त्याला प्रत्यक्ष व्यवहार करताना पॅन-आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे.
  • तसेच नवे करंट अकाऊंट उघडण्यासाठी सुद्धा पॅन कार्ड अनिवार्य असणार आहे.

आधार आणि पॅन कार्ड जोडल्यामुळे इनकम टॅक्स विभागाकडे सर्व आर्थिक व्यवहारांबाबत अपडेट राहणार आहे. तसेच इनकम टॅक्सच्या कक्षेतही अधिकाधिक लोकांना आणण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः रिचार्ज महागणार! Jio, Airtel आणि VI चे हे आहेत नवे दर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.