कोरोना काळात बक्कळ पैसा कमावणाऱ्या ‘डोलो-650’च्या मालकावर आयकर विभागाचे छापे

कोरोना संसर्ग काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच औषधाची विक्री होत होती, ते म्हणजे डोलो-650. या औषधाच्या कंपनीच्या मालकाच्या विविध ठिकाणी आयकर  धाडी टाकल्या. आयकर विभागाच्या जवळपास २० अधिकाऱ्यांनी बंगळुरुच्या माइक्रो लॅब्स लिमिटेडच्या कार्यालयावर हे छापे टाकले आहेत.

२०२० साली ४०० कोटी रुपये कमवले होते 

बुधवारी, ६ जुलै रोजी या कंपनीच्या देशभरातील ४० ठिकाणी आयकर विभागाच्या २०० अधिकाऱ्यांनी छापे मारले. यात नवी दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू आणि गोवा येथील कार्यालयांचा समावेश आहे. मायक्रो लॅब्सचे मालक सीएमडी दिलीप सुराना आणि संचालक आनंद सुराना यांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली आहे. छापेमारी वेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरूच्या माधवनगरमध्ये रेसकोर्स रोडवर असलेल्या कंपनीच्या कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे तपासली आहेत. कर चोरी प्रकरणी हे छापेमारी करण्यात आली आहे. या कंपनीने कोरोना महामारीत २०२० मध्ये ३५० कोटी रुपयांच्या गोळ्या विकल्या. सर्व प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकत ४०० कोटींचा महसूल गोळा केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here