आयकर भरण्यासाठीची मुदत 31 जुलै रोजी संपुष्टात आली आहे. पण अलिकडेच आपल्या एका नियमात आयकर विभागाकडून मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे करदात्यांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या व्यक्तींनी परदेशात कर भरला आहे त्यांना मूल्यांकन वर्ष संपेपर्यंत त्यावर क्रेडिटचा दावा करता येणार आहे. आयकर विभागाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे परदेशात राहणा-या भारतीयांना या नव्या बदलाचा लाभ होणार आहे.
काय आहे बदल?
फॉर्म 67 द्वारे दिले जाणारे रिटर्न आता संबंधित कर निर्धारण वर्ष संपेपर्यंत दिले जाणार आहे. ज्यांनी आपले आयकर रिटर्न निर्धारित मुदतीत भरले असेल त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सीबीडीटीने हा बदल पूर्वलक्षीपणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात परदेशात जमा केलेल्या क्रेडिट(एफटीसी)च्या दाव्यांवर ही सुविधा दिली जाणार आहे.
असा होणार फायदा
या नव्या तरतुदीमुळे भारताबाहेर भरलेल्या करावर भारतात क्रेडिट क्लेम करण्यासाठी फॉर्म-67 चे स्टेटमेंट संबंधित मूल्यांकन वर्ष संपेपर्यंत सादर केले जाऊ शकते. या निर्णयामुळे व्यवसायाच्या सुलभतेला चालना मिळेल आणि रिटर्न भरल्यानंतरही एफटीसीवर दावा केला जाऊ शकतो.
Join Our WhatsApp Community