Diseases of children: लहान मुलांमधील आजारांत वाढ, काळजी घेण्याचे बालरोगतज्ज्ञांचे आवाहन

सध्या मुलांमध्ये श्वसनाचा संसर्ग, फ्लू, सर्दी, डोळ्यांचा संसर्ग यासारखे आजार वाढल्याचे निरीक्षण

122
Diseases of children: लहान मुलांमधील आजारांत वाढ, काळजी घेण्याचे बालरोगतज्ज्ञांचे आवाहन
Diseases of children: लहान मुलांमधील आजारांत वाढ, काळजी घेण्याचे बालरोगतज्ज्ञांचे आवाहन

पावसाळा सुरू होताच वातावरणातील बदलामुळे अनेकांना आजारांचा संसर्ग सुरू होतो. याला लहान मुलेही अपवाद नाहीत. बदलत्या हवामानाचा त्रास लहान मुलांना जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते, कारण त्यांची रोगप्रतिकारक्षमता मोठ्या व्यक्तिंपेक्षाही कमकुवत असते. सध्या मुलांमध्ये श्वसनाचा संसर्ग, फ्लू, सर्दी, डोळ्यांचा संसर्ग यासारखे आजार वाढल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले आहे.

10 वर्षांखालील मुलांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. ही मुले शाळेत जातात. त्यामुळे एकमेकांच्या संपर्काने त्यांना आजारांचा संसर्ग होतो. पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचा जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे ताप, खोकला, सर्दी, जुलाब, उलट्या, अंगदुखी, डोकेदुखी, भूक न लागणे अशा तक्रारींवर औषधोपचार करण्याकरिता पालक त्यांना रुग्णालयात आणतात, अशी माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली.

(हेही वाचा – CIDCO Mass Housing Lottery : सल्लागार आणि व्यवस्थापनातील वादामुळे रखडली सिडकोची ‘मास हौसिंग’ लॉटरी )

लहान मुलांची काळजी कशी घ्याल? 

पालकांनी आपल्या मुलांना या आजारांना बळी पडण्यापासून वाचवणे आणि योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या ऋतुतील वाढत्या आर्द्रतेमुळे जंतुंची संख्या वाढते. काही दिवसांपासून डेंग्युची साथ वाढत आहे, त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच मुलांना न चुकता फ्लूची लस द्यावी.

हातांची स्वच्छता, शिंकताना किंवा खोकताना नाक-तोंड झाकणे, मास्कचा वापर या गोष्टी मुलांना पाळायला सांगाव्यात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करावा.

आजारपणात मुलांना शाळेत पाठवू नये तसेच ताप, सर्दी, खोकला असल्यास तो पूर्ण बरा झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी शाळेत पाठवावे. काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.