Eye Flu : महाराष्ट्रात डोळे येण्याच्या साथीत वाढ, डोळ्यांची निगा राखण्याचे नेत्रतज्ज्ञांकडून आवाहन

बुलढाणा, पुणे, जळगाव, नांदेड आणि अमरावती या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण जास्त

213
Eye Flu : महाराष्ट्रात डोळे येण्याच्या साथीत वाढ, डोळ्यांची निगा राखण्याचे नेत्रतज्ज्ञांकडून आवाहन
Eye Flu : महाराष्ट्रात डोळे येण्याच्या साथीत वाढ, डोळ्यांची निगा राखण्याचे नेत्रतज्ज्ञांकडून आवाहन

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याची साथ वाढत आहे. सध्या राज्यात 4 लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डोळ्यांचा संसर्ग झाला असून हे रुग्ण नेत्र तज्ज्ञांकडून उपचार घेत आहेत. त्यामुळे संसर्गजन्य रुग्णांसह इतर नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.

राज्यात सध्या 4 लाख 75 हजार 123 रुग्णांना डोळ्यांचा संसर्ग झाला आहे. 17 ऑगस्टपर्यंत राज्यात 4 लाख 41 हजार 200 रुग्ण होते तसेच बुलढाणा, पुणे, जळगाव, नांदेड आणि अमरावती या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण जास्त आहे. मुंबई शहरामध्ये डोळे येण्याच्या संसर्गामध्ये राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही, तरीही डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे, असे मत नेत्र तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचा – Vaccination : राज्यातल्या सर्व गोवंशीय पशुधनाचं सात दिवसांत 100 टक्के लसीकरण, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती)

डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी 

– ज्या रुग्णांना डोळ्यांचा संसर्ग झाल्याची लक्षणे जाणवत आहेत,अशांनी सार्वजनिक ठिकाणी भेट देणे टाळावे.
– डोळ्यांना वारंवार हात लावू नये.
– नियमित हात धुवावेत.
– डोळे आलेल्या रुग्णाचे अंथरुण-पांघरुण, टॉवेल, चादर, भांडी तसेच दैनंदिन वापरातील इतर वस्तू वेगळ्या ठेवाव्यात.
– शाळा, वसतिगृह, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी डोळ्यांची साथ आली असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांना तसेच डॉक्टरांना माहिती द्या.
– पालकांनी आपल्या मुलाला डोळे आले असल्यास शाळेत पाठवू नये.

जिल्हा – रुग्णांची संख्या

बुलढाणा   – 45 हजार 865
पुणे        – 37 हजार 830
जळगाव   – 28 हजार 634
नांदेड      – 24 हजार 544
अमरावती  – 22520 हजार
चंद्रपूर      – 21 हजार 644
परभणी    – 19 हजार 874
अकोला    – 15 हजार 433
धुळे       – 15 हजार 616
वर्धा      – 13 हजातर 765

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.