महागाईत जीएसटीची भर! काय स्वस्त, काय महाग? वाचा यादी

73

वस्तू आणि सेवा करात वाढ करण्याचा (GST) निर्णय सोमवारपासून लागू होणार असल्याने ग्राहकांना घरगुती वस्तू, बॅंक सेवा, रुग्णालये आणि हॉटेल्ससाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. हा निर्णय गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ४७ व्या जीएसटी बैठकीत घेण्यात आला. परंतु ही नवी दरवाढ लागू झालेली असताना काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

 ( हेही वाचा : BEST@75 : बेस्टची पंचाहत्तरी; 7 ऑगस्टला साजरा होणार ‘अमृतमहोत्सवी बेस्ट दिन’ )

कोणत्या वस्तू होतील स्वस्त?

  • १८ जुलैपासून ऑस्टोमी उपकरणांवर आणि रोपवेद्वारे माल आणि प्रवाशांच्या वाहतुकीवर १२ टक्क्यांवरून जीएसटी ५ टक्क्यांवर आकारला जाईल.
  • इलेक्ट्रिक वाहनांवर ५ टक्के जीएसटी सवलत
  • ईशान्येकडील राज्ये आणि बागडोगरा येथून विमानाच्या इकॉनॉमी क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीएसटीमध्ये सूट असेल.
  • ट्रक भाड्याने घेण्याचा खर्च कमी, कर १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.

कशावर किती करवाढ ?

  • पीठ, पनीर, दही, लेबल, पॅकबंद अन्नपदार्थांवर ५ टक्के जीएसटी
  • लेखनसामुग्री, चाकू, पेन्सिल, शार्पनर, चमचे, एलईडी दिवे यांच्यावरील कर १२ वरून १८ टक्के करण्यात आला आहे.
  • प्रतिदिन एक हजार रुपयापर्यंत भाडे असलेल्या हॉटेल रुमवरील करसवलत रद्द करून १२ टक्के कर आकारला जाणार आहे.
  • सौरऊर्जेवरील वॉटर हिटरवरील कर पाच टक्क्यांहून १२ टक्के करण्यात आला आहे.
  • रुग्णालयातील पाच हजार रुपयांहून अधिक दर असणाऱ्या खोलीवर ५ टक्के जीएसटी, अतिदक्षता विभागासाठी सवलत दिली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.