कोरोनानंतर तरुणांमध्ये ह्रदयविकाराचा धोका वाढला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रक्तदाब आणि मधुमेह नसलेल्या तरुणांनाही ह्रदयविकार जडल्याची काही प्रकरणे पाहायला मिळत आहेत.
एका 40 वर्षाच्या महिलेला थ्रोम्बोटिक ऑक्लुशनमुळे ह्रदयविकार आला. या महिलेला रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार नव्हते. तरुणांमध्ये धमन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. कोरोनानंतर ह्रदयविकाराच्या झटक्याबरोबरच ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्येही वाढ झाल्याची काही उदाहरणे पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी रांची येथे 28 आणि 34 वर्षाच्या दोघांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. दोघेही रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण नव्हते.
तरुणांमध्ये ह्रदयविकाराच्या या वाढत्या घटनांबाबत जागतिक आरोग्य संघटनेने जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला आहे. आहारात नियमित भाज्या, फळे आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शरीराला पुरेशी पोषक तत्त्वे मिळतील याशिवाय फास्ट फूड, शीतपेये आणि अल्कोहोलचे सेवन न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
नियमित योगाभ्यास करा
कोरोनानंतर हातापायांच्या नसांमध्ये ब्लॉकेजेसची समस्याही वाढली आहे. यामुळे हाता-पायांची नियमित तपासणी करावी तसेच दररोज योगासने, योगाभ्यास यासाठी वेळ काढावा, असेही डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे.