मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशीच इंधन कंपन्यांचा मोठा झटका दिला आहे. पहिल्याच दिवशी एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आलीये. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर दिल्लीत २५.५० रुपयांनी तर मुंबईत २६ रुपयांनी महागला आहे.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल नाही
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करून जोरदार झटका दिला. तर १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात म्हणजे १ फेब्रुवारी रोजी सिलिंडरच्या किंमतीत १४ रुपयांनी वाढ झाली होती.
(हेही वाचा Hindu Temple : कर्नाटकात हिंदू मंदिरावर ‘झिजिया’ कर लागू करण्यासाठी काँग्रेस सरकारने रचला कट)
कोणत्या शहरात किती दर?
किमतीत वाढ झाल्यानंतर आता दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरची किंमत १,७९५ रुपये झाली आहे. यापूर्वी याची किंमत १,७६९.५० रुपये होती. दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या (LPG) किंमती २५.५० रुपयांनी वाढली आहे. मुंबईत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत आता १७२३.५० रुपयांवरून वाढून १७४९ रुपयांवर पोहोचली. तर कोलकात्यात १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १९११ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी याची किंमत १८८७ रुपये होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर सर्वात महाग झाला आहे. आता चेन्नईत याची किंमत १९३७ रुपयांवरून १९६०.५० रुपये झालीये. घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ नाही. घरगुती एलपीजी सिलिंडर म्हणजेच १४ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
Join Our WhatsApp Community