मुंबईत गोवरची संख्या आटोक्यात येत असतानाच गेल्या महिन्यापासून कुर्ला, चुन्नाभट्टी येथे गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. कुर्ला येथील साकीनाका परिसरातील आठ महिन्यांच्या मुलीचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचा संशय मुंबई महानगरपालिकेने व्यक्त केला. यातच गोवरचा अहवाल दिरंगाईने येत असल्याने गेल्या वर्षांतील 11 गोवर रुग्णांच्या तपासणीचा अहवाल पालिकेला सोमवारी मिळाल्याने पालिकेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
( हेही वाचा: 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! घरभाडे भत्त्याच्या नियमांमध्ये बदल )
चिमुकलीचा उपचारानंतर मृत्यू
आठ महिन्यांची मुलगी लसीकरणास पात्र नव्हती. 3 तारखेला मुलीला ताप आल्यानंतर दोन दिवसांनी तिला खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ लागला. पाच दिवसांनी मुलीच्या शरीरावर पुरळ दिसून येताच पालकांनी तिला पालिका रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही आणि 14 तारखेला दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. मृत्यू छाननी अहवाल समितीकडून मुलीचा मृत्यू गोवरमुळे झाला आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे.