ऑगस्ट महिन्यात आठवडाभर संततधार पाऊस गायब आहे. त्यामुळे परिसरात काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांत वाढ झाल्याची नोंद आरोग्य विभागाने दिली आहे. 1 ते 20 ऑगस्ट या कालावधीतील हिवतापाचे 704, लेप्टो 217, डेंग्यू 415, गॅस्ट्रो 660, हेपेटायटिस 48, चिकनगुनिया 14 तर एच1एन1 चे 100 रुग्ण आढळून आले आहेत. 20 दिवसांत हिवताप रुग्णांची आकडेवारी बरीच वाढली आहे. मुंबईतील पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात नुकताच लेप्टोस्पायरोसिसबाधित 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लेप्टोस्पायरोसिस झालेल्या एका 21 वर्षांच्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 18 ऑगस्ट रोजी एका ज्येष्ठ नागरिकाला अत्यावस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाला खासगी रुग्णालयातून तातडीने हलवण्यात आले होते. या रुग्णाचाही लेप्टोस्पायरोसिसमुळे मृत्यू झाला.दोन्ही मृत्यूबाबत केईएम प्रशासन आणि पालिका आरोग्य विभागाने कोणतीच अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.
(हेही पहा – BRICS Business Forum Leaders Council : भारतामध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टिम)
मुंबईत साचलेल्या पाण्याच्या नजीकच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊन पोटाची बाधा झालेले रुग्ण वाढत असल्याचेही निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स करूनही काही रुग्णांना पटकन आराम मिळत नसल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सांधेदुखी डेंग्यूचे लक्षण असू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मलेरियाच्या तुलनेत डेंग्यू जास्त घातक आजार मानला जातो, त्यामुळे डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.
काय काळजी घ्याल
– रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ खाऊ नका.
– साचलेल्या पाण्याजवळच्या नागरी वसाहतीतील नागरिकांनी आरोग्याची आवश्यक काळजी घ्या.
-रस्त्यावर साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नका. पावसात घराबाहेर पडण्यापूर्वी पायाला जखम असल्यास बाहेर जाणे टाळा किंवा मलमपट्टी लावून बाहेर पडा.
-घराबाहेर परिसर, अंगणात साचलेले पाणी स्वच्छ करा.
-घरातील भांडी तसेच झाडाच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका.
– पाणी उकळून प्या.
– तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस पोटदुखी असल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community