कोविड-१९ नंतर राज्यात मद्यपींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मद्यपींच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात मद्यविक्रीत वाढ होऊन राज्याच्या महसुल देखील वाढला आहे. राज्यात २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीत दारूच्या विक्रीत २३ टक्के वाढ झाली असून राज्याच्या तिजोरीत २५.५५० कोटींचे उत्पन्न वाढले आहे. गेल्या अनेक दशकांतील ही सर्वात मोठी वार्षिक वाढ असून जवळपास २५ टक्के राज्याच्या महसुलात मद्याविक्रीतून वाढ झाली असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वाधिक मद्यविक्री कुठे?
मुंबई-ठाणे, पुणे आणि नाशिक विभागाच्या तुलनेत नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागांमध्ये सर्वाधिक मद्यविक्री होऊन महसुलातील वाढ सर्वाधिक प्रभावी ठरली आहे. नागपूरच्या महसुलात ४२.९ टक्के, छत्रपती सभांजीनगर (औरंगाबाद) आणि कोल्हापूरमध्ये अनुक्रमे २९.७ टक्के आणि २८.५ टक्के अधिक विक्रीची नोंद झाली आहे. मुंबई-ठाणे, पुणे आणि नाशिकच्या अबकारी महसुलात सुमारे २३ टक्के वार्षिक वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर व्हेंडर्स (एपीआरएलव्ही)चे उपाध्यक्ष सुमित चावला यांच्या मते नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागात बिअर आणि वाईनला मोठी मागणी आहे, येथील उष्णतेमुळे थंडगार बिअर आणि वाईन्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community