Non-Veg प्रेमींना धक्का! सुरमई, पापलेट नव्या दरात

182

होळीचा सण आला की, खवय्ये चिकन मासळी खाण्याला पसंती देतात. होळी हा मुख्यत: कोळी बांधवांचा सण आहे त्यामुळे या सणाला चविष्ट जेवणाचे बेत आखले जातात. परंतु आवक घटल्याने मासळी महाग झाली आहे. त्यामुळे यंदा नॉन व्हेज प्रेमींना मासळीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सुरमई, पापलेट, कर्ली, लेपो, बांगडे, तार्ली, खेकडे व कोळंबी अशा विविध मासळींचे दर किलोला एक हजार ते बाराशे रुपयांवर पोहोचले आहेत. मासळी महागल्यामुळे खाद्यप्रेमींची पंचायत झाली आहे.

( हेही वाचा : मध्य रेल्वेने ‘ही’ शक्कल लढवत केली तब्बल 87 कोटी रुपयांची बचत! )

गेल्या काही दिवसात वाढते तापमान, वातावरणातील बदल, मच्छीमारांचे रखडलेले अनुदान आदी कारणांमुळे मासळी आवक घटली आहे. प्रामुख्याने होळीच्या सणाला नातेवाईक एकत्र येऊन जेवणाचे बेत आखतात. मात्र यावर्षी मासळीसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. मासळींच्या दरात वाढ झाल्यामुळे परिणामी हॉटेलमधील मच्छी थाळी सुद्धा महागणार आहे.

मासळींचे दर

मासळी आधीचे दर (किलो) आताचे दर (किलो)
कोळंबी ४०० ते ६०० १००० रुपये
सुरमई ६०० ते ७०० १२०० रुपये
पापलेट ६०० ते ७०० १२०० रुपये
तार्ली १०० ते १५० २०० रुपये
खेकडे ३०० ते ४०० ६०० ते ७०० रुपये
चिकन २०० ते २२० २५० ते ३०० रुपये

होळीनिमित्त बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत तसेच मासळीचा हंगाम सुद्धा नाही यामुळे दरात वाढ झाली आहे असे मच्छीमारांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.