Kerala : गेल्या काही दशकांत केरळमधील हिंसाचारात वाढ

151
  • अ‍ॅड. मुरलीधरन्

केरळ (Kerala) मध्ये राष्ट्रविरोधी शक्ती डोकं वर काढण्याचा प्रयत्न करत असल्या, तरीही अशा शक्तींच्या विरोधात राष्ट्रवादी शक्तीही उभ्या रहात आहेत. इस्त्रायलवर हमासने केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर भारत सरकारने इस्त्रायलला पाठिंबा घोषित केला; पण काही लोकांना हमासचा पुळका आहे. त्यामुळे इस्त्रायलचा निषेध करणारे मोर्चे त्यांच्याकडून काढले जात आहेत. सभांचे आयोजन केले जात आहे. मलबार क्षेत्रातील मल्लपूरम जिल्ह्यात हमास समर्थकांनी सभा, निदर्शनांचे आयोजन केले होते. ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त जी सभा आयोजित केली होती, त्या सभेत भारतातील पॅलेस्टिनी राजदूत अदनान अबू अलहैजा आणि गाझामधील इस्लामिक युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. कमलेश नाथ यांची भाषणे झाल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

केरळ (Kerala) पोलिसांकडून राज्यातील दहशतवाद्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. अशा घटनांबाबत स्वतंत्र तपास यंत्रणा हवी. येथील मुसलमान त्यांच्या समाजातील इतरांनाही कारवाया करण्यासाठी पाठिंबा देतात. त्यामुळे पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी किंवा तपास होत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे या विषयाबाबत फारच कमी माहिती समोर येते. केरळमधील परिस्थिती प्रतिकूल असून येथे सध्या हिंसाचारामध्ये वाढ झालेली दिसत आहे. फुटीरतावादी मुसलमानांच्या कारवायाही केरळ (Kerala)मध्ये सुरू आहेत. एकंदरीत केरळमधील मुस्लीम संघटना इस्त्रायलविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. ‘इस्रायल-हमास’ संघर्षामुळे राज्यात काही अनुचित घटना घडू शकतात, अशी भीती येथील शांतताप्रेमी नागरिकांमध्ये आहे. इस्रायलवर हमासने प्रथम स्वत: हल्ला करूनही भारतातील हमासप्रेमी इस्रायलच्या निषेधार्थ विचित्र पद्धतींचा अवलंब करत असल्याचे सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, याला कोणती मानसिकता म्हणावे!

(हेही वाचा Hamas Support Rally in Kerala : केरळचा होतोय काश्मीर…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.