मुंबईला पाणी पुरवठा (Water Storage) करणाऱ्या धरणांमध्ये आता हळूहळू वाढ होत असून यासर्व धरणांमध्ये पाण्याचा साठा तब्बल सुमारे ९३टक्के एवढा जमा झाला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीलाच पाणी साठा ८१ टक्क्यांच्यावर पोहोचला होता, तेव्हा पासून अनेक दिवस हा पाणीसाठा प्रथम ८३ टक्के आणि त्यानंतर ९० टक्क्यांवर स्थिर होता, पण पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्याने पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढली गेली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ९० टक्क्यांवर स्थिर असलेल्या पाण्याची पातळी वाढून आता ९३ टक्क्यांच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे अशाच प्रकारे पाण्याची पातळी वाढल्यास मुंबईवरील संभाव्य पाणी कपातीचे संकट टळले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा – G-20 Summit : दिल्लीतील शिखर संमेलनात उलगडणार 5 हजार वर्षांचा इतिहास,पाहुण्यांच्या स्वागतासाठी करणार AI अँकर)
मुंबईला पाणी पुरवठा (Water Storage) करणार्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्यवैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. ७ ऑगस्ट रोजी हा पाणीसाठा ११ लाख ७२ हजार ९६७ लिटर अर्थात ८१.०४ टक्के एवढा होता. त्यानंतर काही दिवस ८३ टक्क्यांवर पाणी साठा कायम होता, पुढे पुन्हा काही दिवसात हा पाणी साठा ९० टक्क्यांवर आला होता. पण मागील दहा ते बारा दिवसांपासून हा पाणी साठा ९० टक्क्यांवर स्थिर होता. त्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत नसल्याने वर्षभराची तहान भागवण्यासाठी (Water Storage) आवश्यक साठा जमा नसल्याने या आठवड्यात आढावा घेवून पाणी कपात लागू करण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता या पाणी साठ्यात झाल्याने मुंबईकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.
अप्पर वैतरणा धरणात (Water Storage) सध्या ८१.४५ टक्के तर भातसा धरणात ९३.३८ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे.
०८ सप्टेंबर पर्यंतचा पाणी साठा
२०२३ : १३ लाख ४८ हजार ४४९ दशलक्ष लिटर्स (९३.१७ टक्के)
२०२२ : १४लाख २५ हजार ४८३ दशलक्ष लिटर्स (९८.५१ टक्के)
२०२१ : १३ लाख ५५ हजार ४९४ दशलक्ष लिटर्स ( ९३.६५ टक्के )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community