लोणावळा-पुणे-लोणावळादरम्यान 2 मार्चपासून दोन लोकलची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुणे ते लोणावळा दोन्ही बाजूंनी मिळून लोकलच्या 20 फेऱ्या होणार आहेत. मागील आठवड्यात रेल्वे प्रशासनाने तीन लोकल नव्याने कार्यान्वित करण्याचे जाहीर केले होते. यापैकी दोन लोकल 2 मार्चपासून सुरू होणार आहेत.
( हेही वाचा : UPSC च्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी मिळणार का अतिरिक्त संधी? )
लसीकरण पूर्ण झालेले आणि युनिव्हर्सल पास असणाऱ्यांना प्रवाशांना या लोकलने प्रवास करता येणार आहे. त्याशिवाय 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना त्यांचे वयाचे प्रमाणपत्र सादर केल्यावर आणि वैद्यकीय कारणांमुळे लस घेतली नाही असे डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखवल्यावर मासिक पास मिळेल.
नव्याने सुरू होणाऱ्या लोकल
- पहिली लोकल पुण्याहून सकाळी 5.45 वाजता सुटेल. ही लोकल सकाळी 7.05 वाजता लोणावळा स्थानकात पोहचेल.
- लोणावळ्याहून पुढील लोकल 7.25 वाजता लोकल सुटेल. ती पुण्यात 8.48 वाजता दाखल होईल.
- पुण्यावरून दुसरी लोकल सकाळी 9.55 वाजता सोडण्यात येईल. ती लोणावळ्यात 11.15 वाजता दाखल होईल.
- लोणावळ्याहून दुपारी 2.50 वाजता लोकल धावेल. ती पुण्यात दुपारी 4.10 वाजता पोहोचेल.
पुणे-नाशिक मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे
तर पुणे-नाशिक या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी सेमी हायस्पीड रेल्वे येत्या चार वर्षात धावण्याची दाट शक्यता आहे. हा राज्य व केंद्र सरकारचा पथदर्शी प्रकल्प असल्याने तो मार्गी लागत आहे. पुणे-नाशिक रेल्वेमार्ग २३५ किलोमीटर अंतराचा आहे. या मार्गावर साधारणपणे दोनशे किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार आहे. सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग दुहेरी होणार आहे. पुणे ते नाशिक हा प्रवास पावणेदोन तासात पूर्ण करता येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) च्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सहकार्याने राबविला जात आहे.