मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आता अशीही होणार भर

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांतर्गत तसेच विभागांतर्गत मागवण्यात येणाऱ्या निविदा संदर्भात लेखी करार करण्यात येतो. या करारासाठी आकारण्यात येणाऱ्या विधी आकार व लेखन साहित्याच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या सुधारित विधी आकार व लेखन साहित्यांचा आकाराची कंत्राटदारांकडून एप्रिल २०२१ पासून पूर्वलक्षी प्रभावाने वसुली करण्यात येणार आहे. महापालिकेच्या तिजोरीत वाढ करण्याच्या दृष्टीने अशाप्रकारे आकार वाढवण्याचा हा निर्णय महत्वपूर्ण असून, यामुळे जनतेच्या खिशात हात न घालता परस्पर ही वाढ होणार आहे.

आकारात सुधारणा

मुंबई महापालिकेच्यावतीने विविध विकास कामे तसेच पायाभूत विकास कामांसह इतर वस्तूंची खरेदी निविदेद्वारे केली जाते. त्यामुळे खात्यांतर्गत तसेच विभागामार्फत काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये पात्र असलेल्या निविदाकारासोबत लेखी करार करण्यात येतो. या करारपत्रासाठी एकत्रित विधी व लेखन साहित्याचा दर आकारला जातो. या आकारामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

(हेही वाचाः रुग्णालयांना सीईओंची गरज: वरिष्ठ डॉक्टरांना प्रशासकीय कामांतून हवी मुक्तता)

१ एप्रिलपासून अंमलबजावणी

आता १ एप्रिल २०२१ पासून दहा ते पन्नास हजार रुपये पर्यंतच्या कामांसाठी हा दर आकारला जाणार नाही. तर ५० हजार ते १ लाख पर्यंतच्या कामांसाठी ५ हजार ७१० रुपये अशाप्रकारे ५०० कोटींवरील कोणत्याही मयादेपर्यंत हा आकार ८५ हजार ३८० एवढा आहे. या सुधारित आकाराची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येणार आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here