2021-22 या आर्थिक वर्षात देशभरात बनावट नोटांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचा धक्कादायक खुलासा आरबीआयकडून करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे 500 रुपयांच्या खोट्या नोटांनी 100 टक्क्यांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने नोटा तपासून घेणे गरजेचे झाले आहे.
500 आणि 2000 च्या खोट्या नोटा वाढल्या
आरबीआयने दिलेल्या अहवालानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 101.9 टक्के वाढ झाली आहे. तर दुसरीकडे 2000 रुपयांच्या बनावट नोटा 54.16 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
(हेही वाचाः आता Credit Card चे बिल तुमच्या सोयीनुसार भरा, RBI चा मोठा निर्णय)
बनावट नोटांची संख्या
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी 10 रुपयाच्या 16.4 टक्के, 20 रुपयाच्या 16.5 टक्के, 200 रुपयाच्या 11.7 टक्के, 500च्या 101.9 टक्के आणि 2000 च्या बनावट नोटांमध्ये 54.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर 50 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 28.7 टक्के आणि 100 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 16.7 टक्क्यांनी घट झाल्याचे समोर येत आहे.
नव्या नोटांमध्ये घट
सध्या बाजारात 2 हजार रुपयांच्या एकूण 21 हजार 420 लाख नोटा आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षात ही संख्या 24 हजार 510 लाख इतकी होती. त्याआधीच्या आर्थिक वर्षात हा आकडा 27 हजार 398 लाख इतका होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये चलनातील 2 हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत 21.81 टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येत आहे. आरबीआयकडून दोन हजाराच्या नव्या नोटांचा पुरवठा करण्यात आला नसल्यामुळे ही घट झाल्याचे म्हटले जात आहे. तर 500 रुपयांच्या नोटांमध्ये मात्र वाढ झाली आहे.
(हेही वाचाः 2 हजाराच्या नोटांबाबत RBI चा धक्कादायक खुलासा)
Join Our WhatsApp Community