मुंबईतील म्हाडाच्या ज्या ५६ वसाहती आहेत त्यांचा वाढीव सेवा शुल्क माफ करण्याची मोठी घोषणा शुक्रवारी (१५ डिसेंबर) विधानपरिषदेत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी केली आहे. ५६ वसाहतींचा वाढीव सेवा शुल्क माफ करावा अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली होती. त्यांच्या मागणीला आज यश आले असून म्हाडाच्या ५६ वसाहतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. (MHADA)
जुन्या आणि वाढीव दरात ‘इतक्या’ कोटींचा फरक
भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानात काही महिन्यांपूर्वी गृहनिर्माण संस्थांच्या सहकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित होते. यावेळी दरेकर (Pravin Darekar) यांनी मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतींचा वाढीव सेवा शुल्क रद्द करावा अशी मागणी केली होती. तसेच सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत रहिवाश्यांना दिलासा देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज विधानपरिषदेत निवेदन करताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी शासनाने मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतींचा संपूर्ण वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. तसेच जुने दर आणि वाढीव दरात जवळपास ३८४ कोटींचा फरक आहे तो म्हाडाला महाराष्ट्र निवारा निधीतून दिला जाईल, अशी घोषणाही मंत्री सावे यांनी केली. (MHADA)
(हेही वाचा – Dadar Swimming Pool : दादरच्या जलतरण तलावातील पंपात वारंवारचा बिघाड)
सततच्या पाठपुराव्याला यश
गृहनिर्माण मंत्र्यांच्या घोषनेनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, ज्या ५६ म्हाडा (MHADA) वसाहती आहेत त्यात लाखो मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो. त्यांना दीड-दोन लाखाचे वाढीव सेवा शुल्क भरण्याच्या नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे रहिवाशी भयभीत होते. अनेकदा सभागृहात आश्वासने देऊनही हा विषय निकाली निघाला नव्हता. आम्ही काही महिन्यांपूर्वी गोरेगावला गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली होती. त्या परिषदेतही ही मागणी पुढे आली होती. मी आणि प्रसाद लाड याचा सातत्याने पाठपुरावा करत होतो. आज गृहनिर्माण मंत्र्यांनी निवेदनाद्वारे वाढीव सेवा शुल्क रद्द करण्याचा सर्वसामान्यांसाठी क्रांतिकारी असा निर्णय जाहीर केला. मी राज्य सरकारचे (State Govt) अभिनंदन करतो. ५६ वसाहतीत राहणाऱ्या लाखो रहिवाश्यांच्या वतीने धन्यवाद देतो, असेही दरेकर (Pravin Darekar) म्हणाले. (MHADA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community