‘ओमायक्रॉन’मुळे कोरोनाच्या रूग्णांत वाढ

राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांमध्ये दिसून येणारी वाढ ही ओमायक्रॉन विषाणूमुळे असल्याची माहिती राज्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. कोरोना हा आता एन्डॅमिक (दैनंदिन आढळणारा) आजार झाला आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचा टक्का घटला नसल्याने घाबरण्याचे कारण नाही, असेही डॉ. आवटे यांनी सांगितले.

गेल्या आठ दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. परिणामी, राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने हजारांचा टप्पा पार केला. एकट्या मुंबईतच सध्या आठशेहून अधिक रुग्ण आहेत. चार दिवसानंतर सोमवारी पहिल्यांदा रुग्णसंख्या दोनशेच्या आत नोंदवली गेली. सोमवारी राज्यभरातून १२१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात आता १ हजार ३४३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी मुंबईत ८२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे.

तीन आकडी रुग्णसंख्या असलेले जिल्हे 

  • मुंबई – ८२२
  • पुणे – २८५
  • ठाणे – १४१

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here