वायू प्रदूषणामुळे कोल्हापूरकरांचे आयुर्मान तीन वर्षांनी घटल्याचा धक्कादायक दावा शिकागो येथील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमात कोल्हापूरचा समावेश असूनही प्रदूषणामुळे नागरिकांचे आयुर्मान घटल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत कोल्हापूर शहराचा समावेश आहे. कोल्हापुरात दिवसागणिक प्रदूषणाची पातळी वाढत असल्यामुळे कोल्हापूरकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.शहरातील वाढते अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण आयुर्मान घटण्यासाठी कारणीभूत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. पार्टिक्युलेट मॅटर 2.5 म्हणजेच अतिसूक्ष्म धूलिकण हे जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या मानकापर्यंत नियंत्रणात आणल्यास शहरवासीयांचे आयुर्मान सुधारण्यास मदत होईल; याशिवाय धुळीमुळे होणाऱ्या अॅलर्जिक आजारांचे प्रमाणही कमी होऊ शकेल.
(हेही वाचा – Drone Ban: पॅराग्लाईडर्स, पॅरा मोटर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट; ड्रोनच्या वापरावर १६ सप्टेंबरपर्यंत बंदी)
‘ईपीआयसी’च्या अहवालानुसार, सलग चार वर्षे कोल्हापूरकरांच्या आयुर्मानात घट पाहायला मिळत आहे. 2019च्या अहवालात आयुर्मान 2.1 वर्षांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर यात वाढ झाल्यामुळे कोल्हापूरकरांचे आयुर्मान 2.97 वर्षांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवेतील घातक प्रदूषित घटक
श्वासोच्छ्ववासाद्वारे शरीरात जाऊ शकतात, असे हवेतील धूळ, अतिसूक्ष्म कण, अशा धुलिकणांना ‘पार्टिक्युलेट मॅटर’ म्हटले जाते. पीएम 2.5 म्हणजे 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी धूलिकण आणि पीएम 10 म्हणजे, 10 मायक्रॉनपेक्षा कमी असणारे धूलिकण डोळ्यांना न दिसणारे हे हवेतील धूलिकण श्वसनावाटे थेट फुफ्फुसामध्ये जाऊन रक्तात मिसळण्याचा धोका असतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community