सध्या भारतात अपारंपरिक ऊर्जा स्रोत अडचणीत येऊ लागले आहेत, त्यासाठी लागणारे स्रोत कमी होत आहेत आणि दुसरीकडे ते अधिक खर्चिक बनू लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने सौर उर्जेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने याला ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया सोलर इंडस्ट्रीज असोसिएशन यांनी केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री राज कुमार सिंग यांना निवेदनाद्वारे केली.
भारताने देशात सौर ऊर्जा निर्मितीवर भर दिला आहे. त्यासाठी दर वर्षाला नवीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी टार्गेट देण्यात आले. मात्र त्यासाठी सरकारने मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या योजनांतर्गत देशांतर्गत सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या उद्योगांना आणि सौर ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक उत्पादनाची निर्मिती करणाऱ्या स्थानिक कंपन्यांना विशेष प्रोत्साहन द्यावे. बाजारात चिनी कंपन्यांचा जोर अधिक आहे. अशा वेळी चिनी कंपन्यांच्या ऐवजी भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया सोलर इंडस्ट्रीज असोसिएशनने केली आहे. भारताचे सौर ऊर्जा निर्मितीसाठी अधिक सक्षमरित्या प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी निर्यातीसाठी भारतीय कंपन्यांना अनोखी संधी आहे, त्याचाही सरकारने विचार करावा, असेही असोसिएशनने म्हटले आहे.
(हेही वाचा Odisha Train Accident : देशातील 7 मोठे रेल्वे अपघात कोणते? किती जणांचा मृत्यू झाला होता? )
Join Our WhatsApp Community