शासकीय सेवेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय-निमशासकीय अधिकारी व कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील २३ प्राथमिक शिक्षक संघटना १४ डिसेंबर गुरुवार बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य सरकारने या मागणीकडे लक्ष दिले नसल्यामुळे कर्मचाऱ्यां मध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. प्राथमिक शिक्षक संघटनांनी संप पुकारल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जुन्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. (Old Pension Scheme)
१ नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत रुजू झालेले शिक्षक, शिकेतर कर्मचारी, सरकारी निम सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील २३ प्राथमिक शिक्षक संघटना बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने प्रदेशाध्यक्ष केशवराव जाधव यांनी दिली आहे. (Old Pension Scheme )
(हेही वाचा : Weather update: मुंबईकरांना पुढचे ६ दिवस किंचित गारठा जाणवणार, वाचा…हवामानाचा अंदाज)
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा राज्य सरकाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र याची दखल घेतली नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याला वाचा फोडण्यासाठी १७ लाख कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community