देश आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा (Independence Day 2023) करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यावेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांनी पहाटेच सोशल मीडियावरून देशवासीयांना सोशल मीडियाच्या (Independence Day 2023) माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी लिहिले- “तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा. या, या ऐतिहासिक प्रसंगी अमृतकालमध्ये विकसित भारताचा संकल्प दृढ करूया. जय हिंद!”
आप सभी को स्वतंत्रता दिवस की अनेकानेक शुभकामनाएं। आइए, इस ऐतिहासिक अवसर पर अमृतकाल में विकसित भारत के संकल्प को और सशक्त बनाएं। जय हिंद!
Best wishes on Independence Day. We pay homage to our great freedom fighters and reaffirm our commitment to fulfilling their vision. Jai Hind!
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2023
(हेही वाचा – Independence Day 2023 : वीर सावरकरांच्या संकल्पनेतील अखंड भारत; तत्त्व आणि राजकीय व्यवहार)
देशाच्या स्वातंत्र्याला (Independence Day 2023) ७५ वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधानांनी २०२१ मध्ये अमृत महोत्सव कार्यक्रमाला सुरुवात केली. यावर्षी या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी शेतकरी-मच्छीमारांसह १८०० विशेष पाहुण्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे.
‘देश पहले, हमेशा पहले’ (राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम) ही यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाची (Independence Day 2023) थीम आहे. लाल किल्ल्यावर सुरक्षेसाठी १० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.
असा आहे लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम
सकाळी ६:५५ – संरक्षण सचिव पोहोचतील
सकाळी ६:५६ ते ७ – सीडीएस आणि तिन्ही सेना प्रमुखांचे आगमन होईल
सकाळी ७:०६ – पंतप्रधान राजघाटावर पोहोचतील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करतील.
सकाळी ७:०८ – संरक्षण राज्यमंत्री येतील
सकाळी ७:११ – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येणार
सकाळी ७:१८ – पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन आणि त्यानंतर पंतप्रधानांना तिन्ही दलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल
सकाळी ७:३० – पंतप्रधान ध्वजारोहण करतील, रक्षक नॅशनल सॅल्यूट देतील, बँडवर राष्ट्रगीत वाजवंल जाई, त्यानंतर 21 तोफांची सलामी
सकाळी ७:३३ – पंतप्रधानांचे देशाला संबोधन
हेही पहा –
Join Our WhatsApp Community