Independence Day : येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान पुन्हा घरोघरी तिरंगा फडकणार!

249

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मागील वर्षभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाची सांगता ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाने होणार आहे. यंदा देखील १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरी राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

या अभियानाचा शुभारंभ सोहळा तसेच अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन आणि अंमलबजावणीसंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी ४ ऑगस्ट २०२३ महानगरपालिका मुख्यालयात पूर्वतयारी बैठक घेतली. यावेळी महानगरपालिका आयुक्तांनी विविध खात्यांना योग्य ते निर्देश दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (दक्षता) डी. गंगाथरण, जिल्हाधिकारी (मुंबई उपनगरे) राजेंद्र भोसले, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांच्यासह सर्व परिमंडळाचे सहआयुक्त तथा उप आयुक्त तसेच पोलिस, बेस्ट आणि अन्य संबंधीत यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

(हेही वाचा Gyanvapi : ज्ञानवापी सर्व्हेला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी)

मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्व मुंबईकर नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवून आपल्या घरी राष्ट्रध्वज फडकवावा. गत वर्षी महानगरपालिकेने नागरिकांना राष्ट्रध्वज वितरित केले होते. तसेच हे राष्ट्रध्वज सांभाळून ठेवण्याचे आवाहन केले होते. यंदा या उपक्रमासाठी गतवर्षीच्या ध्वजाचा सन्मानपूर्वक वापर करता येईल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

महानगरपालिकेचे मुंबईकरांना आवाहन

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभराच्या कालावधीत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या अभियानाचे केंद्र सरकारच्या वतीने आयोजन करण्यात आले. या अभियानाची सांगता ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाने होणार आहे. मुंबईतील सर्व नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. वसुधा वंदन, पंच प्रण (शपथ), घरोघरी तिरंगा हे उपक्रम आपापल्या घरी, परिसरात आयोजित करून संबंधीत उपक्रमाचे छायाचित्र https://merimaatimeradesh.gov.in आणि https://yuva.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.